फडणवीस भेट आणि भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली : आमदार बबन शिंदे
Babanrao Shinde
Babanrao ShindeSarkarnama

पंढरपूर : भारतीय जनता पक्षात (BJP) जाण्याचा प्रश्नच येत नाही. दिल्लीत कामाच्या निमित्ताने गेलो होतो.‌ त्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महाराष्ट्र सदनात सदिच्छा भेटी घेतली, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबन शिंदे (Baban Shinde) यांनी केला आहे. (There is no question of joining BJP : MLA Baban Shinde)

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज (ता. २५ जुलै) सकाळी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेनंतर सोलापूरच्या राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

Babanrao Shinde
पवारसाहेबांबद्दल नितांत आदर; भाजपप्रवेशाचे तुम्हाला कळेलच : फडणवीस भेटीवर राजन पाटील म्हणाले...

कारखान्याच्या कामाच्या निमित्ताने मी आणि राजन पाटील दिल्लीत गेलो होतो. त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सदनामध्ये उतरलो होतो. त्याच वेळी महाराष्ट्र सदनात असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ सदिच्छा भेट होती, असेही आमदार शिंदे यांनी दूरध्वनीवरून बोलताना प्रतिक्रिया दिली. असे असले तरी आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Babanrao Shinde
राष्ट्रवादीला मोठा धक्का : बबनदादा शिंदे, राजन पाटलांनी घेतली दिल्लीत फडणवीसांची भेट

दरम्यान, माढ्यातून आमदार बबन शिंदे हे तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातून निवडून आलेले ते सर्वात ज्येष्ठ आमदार होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपद अपेक्षित होते. मात्र, त्यांना डावलून पक्षाने शेजारच्या इंदापूर तालुक्यातील दत्तात्रेय भरणे यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली होती, त्यामुळे शिंदे नाराज होते. मात्र, त्यांनी ती नाराजी उघडपणे कधीही बोलून दाखवली नव्हती. दुसरीकडे, आमदार शिंदे यांना साधारण वर्षभरापूर्वी सक्तवसुली संचनालयाची (ईडी) नोटीस आली होती. त्याचीही पार्श्वभूमीवर या भेटीमागे असू शकते, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून होत आहे. त्या नोटिशीला आमदार शिंदे यांच्याकडून उत्तरही देण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com