मोठी बातमी : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर!

काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
Disley Guruji
Disley GurujiSarkarnama

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) गुरुजींचा राजीनामा शिक्षण विभागाकडून नामंजूर करण्यात आला आहे. सोलापूरचे (Solapur) प्राथमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. (Resignation of global teacher Disley Guruji was rejected by solapur education department)

सोलापूरच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या डिसले गुरुजींच्या राजीनाम्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. शिक्षण आयुक्तांनीही डिसले गुरुजींशी राजीनाम्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.

Disley Guruji
धनंजय महाडिकांच्या भीमा परिवाराचा सोहाळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा चौकार

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्युआर कोड’ शिक्षणप्रणाली देणाऱ्या परितेवाडी (ता. माढा) येथील झेडपी शाळेवरील उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांची प्रतिनियुक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एका वर्षानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. पण, जवळपास ३२ महिन्यांत ते एकदाच त्याठिकाणी गेल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याने आणि काही अधिकाऱ्यांकडून जाणिवपूर्वक त्रास होत असल्यावरून त्यांनी थेट नोकरीचा राजीनामाच दिला.

Disley Guruji
भाजपच्या सुभाष देशमुखांना झटका : ग्रामपंचायतींमधील सत्ता शिवसेना-काँग्रेसने हिसकावली

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर देशभर प्रसिध्द झालेल्या डिसलेंनी राजीनामा देऊ नये, म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी त्यांना राजीनामा न देण्याचे आवाहन करण्यात आले. दोन्ही चौकशी समित्यांनी त्यांच्या चुकीवर बोट ठेवले आहे. त्यामुळे ग्लोबल टीचर कारवाईच्या कचाट्यात अडकले होते. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in