NCP Leadr Amarsinh Pandit Helped farmers to get their Money
NCP Leadr Amarsinh Pandit Helped farmers to get their Money

अमरसिंह पंडित यांनी पाठपुरावा केला अन॒ ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती लक्ष्मी आली

गेवराई तालुक्यातील अंतरवाली येथील शेतकऱ्यांचे अनुदान वर्षभरापासून रखडले होते. उपसरपंच किरण वावरे यांनी यासाठी अमरसिंह पंडित यांना साकडे घातले. अमरसिंहांनीही हा विषय हाती घेतला आणि शासन - प्रशासनाकडे प्रयत्न केले. अखेर वर्षभरापासून रखडलेले सव्वा कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मंजूर झाले.

गेवराई (जि. बीड) : माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी पाठपुरावा करुन शेतकऱ्यांचे हक्काचे सव्वा कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिले. तालुक्यातील अंतरवली बु. येथील  शेतकऱ्यांचे एक वर्षापासून अनुदान रखडले होते. ऐन महालक्ष्मी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती लक्ष्मी आली आली. 

अनुदानाचा धनादेश तलाठी श्री. सुलाखे यांनी तलवाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दाखल केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. शेतकऱ्यांचे सिंचन, दुष्काळी अनुदान, दुष्काळी शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांवर अमरसिंह पंडित यांचा कायम पाठपुरावा असतो. असेच गेवराई तालुक्यातील अंतरवाली येथील शेतकऱ्यांचे अनुदान वर्षभरापासून रखडले होते. उपसरपंच किरण वावरे यांनी यासाठी अमरसिंह पंडित यांना साकडे घातले. अमरसिंहांनीही हा विषय हाती घेतला आणि शासन - प्रशासनाकडे प्रयत्न केले. अखेर वर्षभरापासून रखडलेले सव्वा कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मंजूर झाले. 

गौरी गणेशाच्या आमणावेळीच मंजूर अनुदानाचा धनादेश बँकेत जमा झाला. त्यामुळे आता ऐन महालक्ष्मी सणाच्या वेळेला शेतकऱ्यांच्या हाती लक्ष्मी पडणार आहे. इकडे अनुदान मंजूरीचा धनादेश तलाठ्याने बँकेत जमा करताच उपसरपंच किरण वावरे, सरपंच दिपक उमप, सुरेश वावरे, कृष्णा वावरे, अंकुश वावरे, अजिंक्य वावरे, डॉ. अरविंद जाधव, बबन वावरे आदींसह शेतकऱ्यांनी अमरसिंह पंडित यांची भेट घेऊन पेढे भरविले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com