महादेव जानकर बारामतीतून पुन्हा दंड थोपटण्यास तयार; पण...

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाला सोडला, तर मी निवडणूक लढवू शकतो.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

नवी दिल्ली : बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातून माझ्या उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) सोडला, तर मी निवडणूक लढवू शकतो. आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण, मी ती निवडणूक रासपच्या चिन्हावरच लढवेन, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्पष्ट केले. (I Will contest from Baramati; But on the symbol of RSP itself : Mahadev Jankar)

Mahadev Jankar
‘नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी अध्यक्ष होऊन त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाईही होऊ शकते’

एक मराठी वृत्तवाहिनीशी दिल्लीत बोलताना आमदार महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, माझ्या उमेदवारीबाबत अद्याप भाजपशी चर्चा झालेली नाही. मागच्या वेळी मी राज्यात मंत्री असताना भाजपने रासपला बारामतीची जागा सोडली नव्हती, भाजपने स्वतः ती जागा लढवली होती. मी त्यांना विनंती केली होती की, बारामतीची जागा रासपला द्या. पण त्यांनी आम्हाला दिली नव्हती.

Mahadev Jankar
बारामती जिंकणं शक्य; पण पवारसाहेबांच्या...: महादेव जानकरांनी सांगितली व्यूहरचना!

भाजपने रासपला बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला, तर मी निवडणूक लढवू शकतो, आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण, ती निवडणूक मी रासपच्याच चिन्हावर आम्ही आमचं अस्तित्व ठेवून भाजपची इच्छा असेल तर लढवू शकतो. त्यादृष्टीने आम्ही भाजपशी चर्चा करण्यास तयार आहोत, असेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
बारामतीत भाजप कोणाला मैदानात उतरवणार? हर्षवर्धन पाटील, काळे की कांचन कुल?

बारामती लोकसभा मतदारसंघात सतत उमेदवार बदलल्यामुळे भाजपचा तोटा होत गेला, हे वास्तव आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. पण, बारामतीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली असती तर आम्ही अधिक ताकदीने लढलो असतो. कारण, राष्ट्रीय समाज पक्षाला जेवढी मतं मिळाली होती, तेवढी मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली नव्हती, हेही लक्षात ठेवले पाहिजे. उमेदवारीच्या दृष्टीने भाजपने एकाच कोणातरी व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असा सल्लाही जानकर यांनी भाजपला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com