प्रणव मुखर्जी - विद्वान, अभ्यासू, चाणाक्ष, व्यूहनितीतज्ञ 'भारतरत्न' - Bio Data and Political Career of Pranab Mukherjee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

प्रणव मुखर्जी - विद्वान, अभ्यासू, चाणाक्ष, व्यूहनितीतज्ञ 'भारतरत्न'

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

आपल्या देशाचे १३ वे राष्ट्रपती भारतरत्न प्रणवकुमार मुखर्जी यांचे आज दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांचा जीवन परिचय आणि राजकीय वाटचालीवर एक दृष्टीक्षेप 

संपूर्ण नाव – प्रणवकुमार मुखर्जी.

जन्मतारीख – ११ डिसेंबर १९३५.

जन्मस्थळ – मिराती, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल.

शिक्षण – एमए (इतिहास), एमए (राज्यशास्त्र), एलएलबी, डी लिट (होनोरीस काँजा), सुरी येथील विद्यासागर महाविद्यालय, कोलकता विद्यापीठ, पश्चिम बंगाल.

पत्नी - सुवरा, उभयतांना २ मुले आणि मुलगी आहे.

वडील – किंकर मुखोपाध्याय सरानी, आई – राजलक्ष्मी.

भारताचे तेरावे राष्ट्रपती (२५ जून २०१२ ते २५ जुलै २०१७)

प्रणव मुखर्जी यांची संसदेतील वाटचाल

जुलै १९६९ – राज्यसभेवर निवडून गेले.

फेब्रुवारी १९७३ – जानेवारी १९७४ – औद्योगिक विकास खात्याचे केंद्रात उपमंत्री.

जानेवारी १९७४ – आँक्टोबर १९७४ – केंद्रात जहाज आणि वाहतूक उपमंत्री.

आँक्टोबर १९७४ - डिसेंबर १९७५ – केंद्रीय वित्तराज्यमंत्री.

जुलै १९७५ – राज्यसभेवर दुसऱयांदा निवडून गेले.

डिसेंबर १९७५- मार्च १९७७ – केंद्रात महसूल आणि बँकिंग खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र भार).

१९७८–१९८० – काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील उपनेते.

२७ जानेवारी १९७८-१८ जानेवारी १९८६ आणि १० आँगस्ट १९९७ – २५ जून २०१२ – काँग्रेस कार्यकारी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य.

१९७८-१९७९ – अखिल भारतीय काँग्रेसचे कोषाध्यक्ष.

१९७८-१९८६ – केंद्रीय संसदीय समितीत काँग्रेसचे प्रतिनिधी.

जानेवारी १९८०-जानेवारी १९८२ – पोलाद आणि खाण, वाणिज्य खात्याचे मंत्री.

१९८०-१९८५ – राज्यसभेतील नेते. हक्कभंग समितीचे सदस्य, कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, राज्यसभेतील नियम समितीचे सदस्य.

आँगस्ट १९८१ – तिसऱयांदा राज्यसभेवर निवडून गेले.

जानेवारी १९८२- डिसेंबर १९८४ – वाणिज्य आणि पुरवठा खात्याचा अतिरिक्त कारभार.

१९८४, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ – काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख.

१९८५ आणि आँगस्ट २०००-जून २०१० – पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.

१९८७-१८८९ – अखिल भारतीय काँग्रेसच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष.

जून १९९१-मे १९९६ – नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.

१९९३ – चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले.

फेब्रुवारी १९९५-मे १९९६ – परराष्ट्र व्यवहार मंत्री.

१९९६-२००४ – राज्यसभेतील काँग्रेसचे पक्ष प्रतोद.

१९९६-१९९९ – परराष्ट्र व्यवहार खात्याच्या समितीचे सदस्य.

१९९७ – पर्यावरण आणि वन तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्यांच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष.

१९९९ – सलग पाचव्यांदा राज्यसभेवर निवड.

२८ जून १९९९ – अखिल भारतीय काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्ष.

जून १९९८ – मे २००४ – गृह खात्याच्या स्थायी समितीचे सदस्य.

१२ डिसेंबर २००१ – २५ जून २०१२ – केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य.

१३ मे - चौदाव्या लोकसभेत निवडून गेले.

२३ मे २००४ – २४ आँक्टोबर २००६ – केंद्रीय संरक्षण मंत्री.

जून २००४- जून २०१२ – लोकसभेतील सभागृह नेते.

२५ आँक्टोबर- २३ मे २००९ – परराष्ट्र व्यवहार मंत्री.

२४ जानेवारी २००९-मे २००९ – केंद्रीय अर्थमंत्री.

२० मे २००९ – पंधराव्या लोकसभेवर निवड.

२००९- २६ जून २०१२ – केंद्रीय अर्थमंत्री.

२५ जून – काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

मुखर्जी यांनी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कार्यकारी मंडळावर काम केले आहे. ते असे -

१९८२-८५ आणि २००९-१२ – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

१९८२-८५ आणि २००९-१२ – जागतिक बँक.

१९८२-८५ आणि २००९-१२ – अशियाई विकास बँक.

१९८२-८५ आणि २००९-१२ – आफ्रिकन विकास बँक.

(संदर्भ - सकाळ संशोधन व संदर्भ विभाग) 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख