आजचा वाढदिवस : आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे  - Today birthday: MLA Suresh Bhole | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आजचा वाढदिवस : आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 13 जून 2021

सामाजिक कार्याची आवड असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते कार्यकरीत होते.

जळगाव ; पक्षाचा साधा कार्यकर्ता ते नगरसेवक, आमदार आणि जिल्हाध्यक्ष अशी वाटचाल जळगाव येथील भाजप आमदार (Bjp) व विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ राजुमामा भोळे (MLA Suresh Bhole) यांची आहे. (Today birthday: MLA Suresh Bhole) 

सामाजिक कार्याची आवड असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते कार्यकरीत होते. पुढे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त म्हणून सामाजिक कार्य सुरू ठेवले. याच कामाच्या बळावर ते जळगाव नगरपालिकेचे नगरसेवक झाले, पुढे महापालिकेचे भाजपचे विरोधी पक्ष नेता झाले.

हे ही वाचा : मोदी सरकारच्या 7 वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के तर डिझेलवरील करात 600 टक्के वाढ

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना जळगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. आणि ते विजयी झाले. जळगाव विधानसभेतून तब्बल नऊ वेळा निवडून आलेले दिग्गज आमदार सुरेशदादा जैन यांचा त्यांनी पराभव केल्याने राज्यात त्यांची जायंट किलर म्हणून ओळख झाली. सर्वसामान्य माणसाला सहज भेटणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण असल्याने या संपर्कामुळे त्यांच्या आमदारकीचे कार्य दिसून आले. पुढे जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आणि त्यांच्या पत्नी सीमा भोळे महापौर झाल्या.

हे ही वाचा :  खेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूनिका महागात

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना जळगाव विधानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली आणि आपल्या कार्याच्या बळावर ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यानी पक्ष सोडल्यामुळे पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या सोबत त्यांना जिल्ह्यात पक्षाची ताकद कायम टिकविण्याचे आव्हान आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख