आजचा वाढदिवस - धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री

आजचा वाढदिवस - धनंजय मुंडेजन्म तारीख : १५ जुलै १९७५जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, तथा पालकमंत्री बीड जिल्हा, असा राजकीय प्रवास केलेल्या धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस
Dhananjay Munde Birthday Today
Dhananjay Munde Birthday Today

नंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद संभाळलेल्या धनंजय मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला मागच्या वेळी आपल्या आक्रमक भाषणांनी सळो की पळो केले. 

दरम्यान, परळी मतदार संघातून त्यांनी भाजप नेत्या व तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पक्षाने त्यांना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या महत्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीद दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, परळी नगर परिषद, परळी बाजार समिती अशा विविध समस्थांवर सत्ता आहे. संत नागा जगमित्र सहकारी सुतगिरणीचे ते संस्थापक आहेत. त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com