vrunda karat and Central government | Sarkarnama

आर्थिक व्यवस्था संकटात, हे तर पाकीटमार सरकार - वृंदा करात

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : " केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांची दरवाढ केली. मोदी सरकारने नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा निराशाजनक आहे. सध्या देशाची आर्थिक व्यवस्था संकटात आहे. मोदी सरकारमुळे हे संकट आणखीच गडद होत आहे. हे पाकीटमार सरकार आहे,'' अशी टीका कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांनी पत्रकार परिषदेत केली. 

शहरातील व्याख्यानमालेसाठी वृंदा करात औरंगाबादेत आल्या होत्या. व्याख्यानापूर्वी त्यांनी सिटू कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ""केंद्र सरकारने बजेट सादर केल्यावर तीन दिवसांनी जेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑल इज वेल असे सांगितले; पण ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती आहे. एलआयसी, एअर इंडिया यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्या विक्रीस काढल्या आहेत. देशात रोजगाराच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. मनरेगा योजनेसाठीच्या निधीत नऊ हजार 500 कोटींची कपात केली. अन्नसुरक्षा निधीतही 75 हजार कोटींची कपात करण्यात आली. एनआरसी आणि एमपीआर हे या सरकारचे राजकीय त्रिशूळ आहे. हा धर्मनिरपेक्षतेवर आघात आहे. एमपीआरच्या संदर्भात सरकारला उत्तर द्यावेच लागणार आहे. देशात या कायद्याची गरज नाही,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला प्रा. पंडित मुंडे, ऍड. मनोहर टाकसाळ, उद्धव भवलकर, उमाकांत राठोड, भगवान भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शहीददिनी देशभर आंदोलन 
""शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्चला फासावर लटकवण्यात आले होते. या शहीद दिवसाचे औचित्य साधून देशभरात डावे पुरोगामी पक्ष संघटनातर्फे देशभरात या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेत. भीमा कोरेगावच्या घटनेच्या पाठीमागे आरएसएस होते हे लपून राहिले नाही असा आरोपही करात यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख