voting sleep issue | Sarkarnama

मतपत्रिकांद्वारे निवडणुकीचा  मुद्दा पुन्हा राजकीय ऐरणीवर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच, आता इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीसंबंधीच्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याचा मुद्दा पुन्हा राजकीय ऐरणीवर आला आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच, आता इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीसंबंधीच्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याचा मुद्दा पुन्हा राजकीय ऐरणीवर आला आहे. 

गेल्या काही निवडणुकांदरम्यान मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याच्या तसेच त्याच्याशी छेडछाड केली जात असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे पुढील वर्षी होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी देशातील सतरा राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पक्षांनी ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मतत्रिकेचा वापर करण्याची मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये प्रामुख्याने तृणमूल कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षांचाही समावेश आहे. समाजवादी पक्षाने यापूर्वी अनेक वेळा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी मतपत्रिकेच्या वापराची मागणी करताना यासाठी अन्य पक्षांशी चर्चा करून निवडणूक आयोगावर दबाव टाकला जाईल असे म्हटले होते. उत्तर प्रदेश, पंजाबसह अनेक राज्यांत झालेल्या निवडणुकांदरम्यान विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचे आरोप करताना पक्षांच्या पराभवाला ईव्हीएमलाच जबाबदार धरले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख