voting machine in court mumbai | Sarkarnama

व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयातील प्रात्यक्षिकांच्या उपक्रमात न्यायाधीशांसह वकील, कर्मचारी आणि पक्षकारांनी याबाबत माहिती घेतली. 

मतपत्रिका मिळणार नाही का, हा प्रश्‍न बहुतेक जणांनी उपस्थित केला.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने व्हीव्हीपॅट उपक्रमांतर्गत शहर-उपनगरात मतदानाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांत गैरप्रकार होत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. त्यातूनच व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांची निर्मिती करण्यात आली आहे. 

मतदारांनी निवडीचे बटन दाबल्यास सात ते आठ सेकंदांत व्हीव्हीपॅट यंत्रावर दर्शनी भागात संबंधित पक्षाचे चिन्ह व क्रमांक दिसतो. त्यावर उच्च न्यायालयातील कर्मचारी, वकील, पक्षकार आणि न्यायाधीशांनी प्रात्यक्षिक केले आणि नोंदवहीत अभिप्राय लिहिला.

व्हीव्हीपॅट यंत्रातील मतचिठ्ठी खाली पडताना दिसत नाही, आठ सेकंदांचा अवधी अपुरा असून, अणखी दोन सेकंदांनी वाढ करायला हवी, अशा सूचना करण्यात आल्या. मतपत्रिका मिळत नसल्यामुळे विश्‍वासार्हता किती, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला. 

अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हे मतदानयंत्र वापरल्यास निवडणुकीत पारदर्शकता येईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. न्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांना मंगळवारी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. न्याय प्रशासनाने जनजागृती करण्यासाठी न्यायालय परिसरात गुरुवारपर्यंत प्रात्यक्षिक दाखवण्यास परवानगी दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख