रशियन नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पुतिन यांनी रस्त्यावर सोडले सिंह #factcheck

पुतिन आणि ट्रम्प यांच्या नावावर सोशल मिडियात कोणत्याही पुड्या सोडल्या जातात. त्यातील अशीच ही एक पुडी आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर अशा अफवांपासून दूर राहिले पाहिजे.
PUTIN-LION
PUTIN-LION

पुणे : ऱशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची प्रतिमा कठोर असा प्रशासक म्हणून आहे. जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रशियातही दिसू लागला आहे. या कोरोनाला अटकाव करण्याासाठी रशियातही संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंग करण्यात येत आहे.

पुतिन यांच्या कठोर प्रतिेमेला अनुसरून त्यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नये म्हणून वेगळाच मार्ग चोखाळल्याची चर्चा आहे. त्यांच्या या खेळीमुळे रशियातील रस्ते सुनेसुने झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ती खेळी म्हणजे त्यांनी रस्त्यांवर 500 ते 800 सिंह मोकळे सोडले आहेत. या सिंहांच्या भीतीमुळे नागरिक घरात गुपचुप बसून आहेत. त्यासाठी ब्रेकिंग न्यूजद्वारे एका टिव्ही चॅनेलच्या स्क्रिनचा फोटो सिंहासह व्हायरल झाला आहे. 

अर्थात ही फेकन्यूज असून गेले दोन दिवस ती सोशल मिडियात चर्चेत आहे. पुतिन यांनी असे काही केल्याची बातमी कोणत्याच इतर अधिकृत वेबसाइट किंवा वृत्तवाहिन्यांवर नाही. सिंहाचा हा फोटो दक्षिण आफ्रिकेतील 2017 मधला आहे. तो एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबला आहे. तोच फोटो आता परत सर्वत्र व्हायरल होत आहे.

पुतिन यांनी घराबाहेर पडणाऱ्यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केल्याचेही सोशल मिडियात फिरत आहे. मात्र त्यालाही अद्याप अधिकृत दुजोर मिळालेला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com