नागपूर विमानतळावरुनच परत गेला `पीएम नरेंद्र मोदी'चा नायक 

नागपूर विमानतळावरुनच परत गेला `पीएम नरेंद्र मोदी'चा नायक 

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटाचा नायक अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमोशनसाठी नागपुरात आला. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित होती. पण दरम्यानच्या काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याची बातमी समाजमाध्यमांवर झळकली. त्यामुळे विवेक विमानतळावरुनच परत गेला. 

पत्रकार परीषद रद्द झाल्याचे समजल्यावर विवेकला केवळ अनौपचारीकपणे भेटू देण्याची मागणी काही पत्रकारांनी आयोजकांकडे केली. तेही शक्‍य नसेल तर विवेकचे विमानतळावरील एखादे छायाचित्र उपलब्ध करुन देण्याबाबतही म्हटले. पण आयोगाने स्थगिती दिल्यामुळे विवेक "लॅंड'च झाले नाही, असे आयोजकांनी सांगितले. विवेक येणार म्हणून वाट बघत बसलेल्या त्याच्या चाहत्यांचाही हिरमोड झाला. 

लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळावी म्हणून आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक काळापर्यंत स्थगिती दिली आहे. मोदींच्या बायोपीकमुळे भाजपला निवडणुकीत लाभ होऊ शकतो, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोदवले. 

या चित्रपटाचे प्रदर्शन म्हणजे आचारसंहीतेचा भंग असल्याची विरोधकांची तक्रार होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च नायालयाने फेटाळून लावत याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. आज आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक काळापर्यंत स्थगिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com