युवकांनो सावध व्हा, सोशल मिडीयामुळे 'सैराट' वृत्ती वाढत आहे - विश्वास नांगरे - पाटील - Vishwas Nangre Patil in Nashik Lecture series | Politics Marathi News - Sarkarnama

युवकांनो सावध व्हा, सोशल मिडीयामुळे 'सैराट' वृत्ती वाढत आहे - विश्वास नांगरे - पाटील

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 मे 2019

''सोशल मिडीयाद्वारे युवकांपर्यंत पोहोचणारे बहुतांश संदेश द्वेष वाढविणारे असतात. त्यातून समाजात द्वेष वाढतो आहे. हे खुपच धोकादायक आहे. त्याला सामोरे जाणे एक आव्हान आहे. त्यामुळे युवकांनी अतिशय जागरुक राहून सोशल मिडीयाकडे पाहिले पाहिजे,'' असा सल्ला नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी युवकांना दिला.

नाशिक : ''सोशल मिडीयाद्वारे युवकांपर्यंत पोहोचणारे बहुतांश संदेश द्वेष वाढविणारे असतात. त्यातून समाजात द्वेष वाढतो आहे. हे खुपच धोकादायक आहे. त्याला सामोरे जाणे एक आव्हान आहे. त्यामुळे युवकांनी अतिशय जागरुक राहून सोशल मिडीयाकडे पाहिले पाहिजे,'' असा सल्ला नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी युवकांना दिला.

येथील वसंत व्याख्यानमालेत  'युवकांपुढील आव्हाने आणि अपेक्षा' विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले ''सोशल मिडीयाचे आक्रमण कसे थांबवायचे? हे मोठे आव्हान पोलीस, प्रशासन व समाजापुढे आहे. आजच्या तरुणाईवर विविध घटकांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. हे संक्रमण होताना तरुणांनी उद्दिष्टाचे नियोजन करून वाटचाल केली, तर अवघड काहीच नाही. मात्र आजच्या काळात 'ईझम' मुळे समाज पोखरला जात आहे. त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.'' 

ते पुढे म्हणाले, ''युवकांमध्ये मोबाईल नावाच्या राक्षसाने केलेला प्रवेश आणि त्याच्या जोडीला असलेल्या सोशल मीडियामुळे सैराट वृत्ती वाढत आहे. सोशल मीडियावर धार्मिक व जातीय द्वेष पसरविला जात असताना याबाबत महाविद्यालय व घराघरांत पाल्यांशी शिक्षकांनी सकारात्मक संवाद साधणे आवश्‍यक आहे. तरुण वेगळ्या मार्गाला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. १४ ते २५ वयोगटामध्ये मेंदूचा पुढचा भाग विकसित होत असतो. या सैराट वृत्तीमुळे तो भरकटत आहे. मात्र, केवळ पोलिस त्याला थांबवू शकत नाहीत. हे रोखण्याकरिता समाजात चांगल्या गोष्टींचे विचारमंथन होणे आवश्‍यक आहे. आयुष्य हा एक प्रकारचा प्लॅन आहे. त्याची ब्लू प्रिंट प्रत्येकाने तयार केली पाहिजे. त्यानुसार आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवून त्यानुसार नियोजन करणे गरजेचे आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख