छेड काढणाऱ्या मवाल्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश - Vishwas Nangare Patil directs to take strict action against road Romios | Politics Marathi News - Sarkarnama

छेड काढणाऱ्या मवाल्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

मिलिंद संगई :सरकारनामा ब्युरो 
रविवार, 10 डिसेंबर 2017

बारामती :  शालेय किंवा महाविद्यालयीन युवतींची छेड काढणे, यापुढील काळात महागात पडणार आहे. कारण, छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. 

बारामतीत शनिवारी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा आदेश दिला. शनिवारच्या बैठकीत छेडछाडीच्या घटनांबाबत सातत्याने उल्लेख झाला. त्याची नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत फौजदार वर्षा जगदाळे यांना काही सूचना केल्या. 

छेडछाडीचे प्रकार जेथे होतात, त्याचे पोलिसांनी हॉट स्पॉट तयार केले आहेत, त्यात त्यांनी ए. बी. सी. असे प्रकार केलेले आहेत. जेथे असे प्रकार सातत्याने होतात, अशा ठिकाणांना 'ए' प्रकारात समाविष्ट केले असून, तेथे दामिनी व निर्भया पथकाने दररोज भेट द्यावी.

'बी' प्रकारात समाविष्ट असलेल्या ठिकाणांना तीन दिवसांतून एकदा; तर 'सी' प्रकार असलेल्या ठिकाणास आठवड्यातून एकदा भेट देण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. 

पालकांनीही आपल्या मुलांना छेडछाड व तत्सम प्रकारांपासून दूर राहण्याबाबत सांगितले पाहिजे, अशा कोणत्याही घटनांतून विद्यार्थी किंवा विवाहित पुरुषही सापडले तर त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे मुलांचे करिअर धोक्‍यात येऊ शकते, याची जाणीव पालकांनीही ठेवणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख