शाबासकीही द्या, चुकलो तर कान धरा - डॉ. विश्‍वजीत कदम - vishwajeet kadam campaigns in audumbar | Politics Marathi News - Sarkarnama

शाबासकीही द्या, चुकलो तर कान धरा - डॉ. विश्‍वजीत कदम

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

डॉ. पतंगराव कदम यांनी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. कुटुंबातील सदस्य, भाऊ, मुलगा समजून काम सांगा. चुकलो तर कान धरा. चांगल्या कामाला शाबासकी द्या, असे भावनिक आवाहन कॉंग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी 
केले. 

अंकलखोप : डॉ. पतंगराव कदम यांनी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. कुटुंबातील सदस्य, भाऊ, मुलगा समजून काम सांगा. चुकलो तर कान धरा. चांगल्या कामाला शाबासकी द्या, असे भावनिक आवाहन कॉंग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी 
केले. 

औदुंबर (ता. पलूस) येथे प्रचार प्रारंभावेळी ते बोलत होते. श्री दत्त मंदीरात आमदार सुमनताई पाटील, श्रीमती विजयमाला कदम, आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते प्रचार प्रारंभ झाला. 
निवडणूक प्रचाराच्या प्रारंभी नारळ फोडण्याचा मान प्रथमच महिलांना देण्यात आला. भाषण करणाऱ्यांतही महिला अधिक होत्या. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. 

डॉ. कदम म्हणाले,""डॉ. पतंगराव कदम यांनी माणूस हिच जात व माणूसकी हा धर्म मानून वाटचाल केली. त्याच वाटेवरून मीही चालत आहे. साखर कारखाना सूतगिरणीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केला. भारती विद्यापीठाच्या विविध शाखांत सर्व जाती जमातीचे विद्यार्थी, कर्मचारी घेतात. पलूस कडेगाव तालुक्‍यांची निर्मिती केली. मुलींच्या शिक्षणासाठी कडेगाव येथे संकुल उभे केले. पलूसला एमआयडीसी सुरू करून उद्योजकांना संधी दिली.'' 

ते म्हणाले,""महापूर व नंतर प्रत्येक गाव व पूरग्रस्ताला मदतीचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ व विविध संस्थांच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत मदत केली. तीन हजार विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.'' 

राष्ट्रवादीचे मारूती चव्हाण, आमदार सुमनताई पाटील, शकुंतला मोरे, आवडाबाई सदामते, क्षितिजा पवार, सुश्‍मिता जाधव, डॉ. मीनाक्षी सावंत, बाळकृष्ण यादव, ए. डी. पाटील, मालन 
मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. 

महिला कॉंग्रसेच्या तालुकाध्यक्ष श्वेता बिरनाळे यांनी प्रास्ताविक केले. लता ऐवळे-कदम यांनी सूत्रसंचालन केले. 

आमदार मोहनराव कदम, श्रीमती विजयमाला कदम, सौ. स्वप्नाली कदम, महेंद्र लाड, जयसिंगराव कदम, प्रकाश उर्फ बाळासाहेब पवार, आनंदराव मोहिते, जे. के. बापू जाधव, सरपंच अनिल विभूते, सर्जेराव पवार, वैभव पुदाले, सुहास पुदाले, गणपतराव पुदाले, शांताराम कदम, डॉ. मीनाक्षी सावंत, मनीषा रोटे, शांताराम कदम, सुनिता चौगुले, जितेश कदमव कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख