विश्वजीत कदम यांनी आमदारकीची शपथ घेतली

विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीविश्वजीत कदम यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.
Vishvajeet-Kadam-Oath
Vishvajeet-Kadam-Oath

मुंबई  : पलूस-कडेगाव मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. 

कै . पतंगराव कदम यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती . यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्याला लोकसभा सदस्य अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे, मोहनराव कदम, जयंत पाटील, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड,  अमरनाथ राजूरकर, हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेचे विद्यमान सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सदस्य सर्वश्री जयंत पाटील,सुनिल तटकरे,  डी.पी.सावंत, डॉ. सतेज पाटील, गोपालदास अग्रवाल, सुनिल केदार, प्रणिती शिंदे विधीमंडळाचे सदस्य, यावेळी उपस्थ‍ित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com