पुन्हा एकदा 'अग्रदूत बंगला' आपली वाट बघतोय!

पुन्हा एकदा 'अग्रदूत बंगला' आपली वाट बघतोय!

कदम यांना पक्षश्रेष्ठीकडून मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

पुणे: कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना संभाव्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल, अशी आशा समर्थकांना आहे. मंत्रीपदाची आशा पल्लवित झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कदम समर्थक 'पुन्हा एकदा अग्रदूत बंगला आपली वाट बघतोय' अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियातून करत आहेत.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसकडून विश्वजीत कदम स्वतः विजयी झालेच, त्याशिवाय जतची जागा विजयी करण्यात मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळे कदम यांना पक्षश्रेष्ठीकडून मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

दिवंगत नेते पतंगराव कदम यांचा 1999 मध्ये मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हा त्यांना मलबार हिलवरील 'अग्रदूत' हा शासकीय बंगला मिळाला होता. त्यानंतर 2014 पर्यंत मंत्री म्हणून त्यांचा याच बंगल्यात निवास होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र विश्वजित यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. ही शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांना पतंगराव साहेबांचा 'अग्रदूत' हा शासकीय बंगला मिळावा, अशी समर्थकांना अपेक्षा आहे. म्हणूनच समर्थक 'बाळासाहेब, अग्रदूत बंगला आपली वाट पाहतोय' अशा प्रकारच्या पोस्ट करत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com