vishvajeet kadam pune | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राहुल गांधी माझे भवितव्य ठरवतील : विश्‍वजीत कदम

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

"" निवडणुकीच्या मतदार यादीत माझे नाव सांगलीत होते. त्यामुळे तेथून प्रदेशवर प्रतिनिधी म्हणून मी जाणे संयुक्तिक होते. दीप्ती चवधरी यांची कोथरूडमधून प्रदेश प्रतिनिधीत्त्वासाठी शिफारस मीच केली होती.'' माझे नाव कोणत्या मतदार यादीत आहे, मी कोठे वास्तव्य करतो, या पेक्षा पक्षाची गरज असेल तेथून मी निवडणूक लढविणार, असे म्हणत विश्‍वजीत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

पुणे : युवकांचे व पक्षाचे नेते राहुल गांधी हेच माझे भवितव्य ठरवतील. मात्र, पक्षासाठी पुण्यातच नव्हे तर, महाराष्ट्रात सगळीकडेच मी काम करणार आहे, असे स्पष्टीकरण प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम यांनी "सरकारनामा'शी बोलताना शुक्रवारी केले. 

कदम म्हणाले, ""प्रदेश युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत गावोगावी फिरत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अन्य जिल्ह्यांप्रमाणेच पुणे आणि सांगलीतही काम करीत आहे. कोणती निवडणूक मी कोठून लढवावी, याचा निर्णय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी घेतील. पक्षासाठी मी कोणतेही काम करण्यास तयार आहे.'' 

लोकसभा निवडणुकीत 2014 मध्ये पुण्यात उमेदवारीसाठी अनेकजण इच्छूक होते. तरीही पक्षाने माझ्या ध्यानीमनी नसताना उमेदवारी दिली होती. त्यानंतर गेली तीन वर्षे शहर पक्ष संघटनेतही मी सक्रिय आहे, असेही विश्‍वजीत यांनी निदर्शनास आणले. प्रदेश कॉंग्रेसवर सांगलीमधून का गेलात, असे विचारले असता कदम म्हणाले, "" निवडणुकीच्या मतदार यादीत माझे नाव सांगलीत होते. त्यामुळे तेथून प्रदेशवर प्रतिनिधी म्हणून मी जाणे संयुक्तिक होते. दीप्ती चवधरी यांची कोथरूडमधून प्रदेश प्रतिनिधीत्त्वासाठी शिफारस मीच केली होती.'' माझे नाव कोणत्या मतदार यादीत आहे, मी कोठे वास्तव्य करतो, या पेक्षा पक्षाची गरज असेल तेथून मी निवडणूक लढविणार, असे म्हणत विश्‍वजीत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख