Vishnu Savra to work for Palghar development | Sarkarnama

जिल्ह्यातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न करू- ना. विष्णू सवरा

नीरज राऊत 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पालघर जिल्ह्याचा चौथा वर्धापनदिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.

पालघर : पालघर जिल्ह्याची चार वर्षांत चांगली प्रगती झाली आहे. जिल्ह्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे करतील, अशी ग्वाही पालकमंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी   दिली.

पालघर जिल्ह्याचा चौथा वर्धापनदिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. जिल्हा मुख्यालयाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पालघरच्या विकासाकडे मुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष आहे, असे सवरा यांनी सांगितले. जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 10 हजार कुटुंबांना विशेष मदत दिली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, सभापती धनश्री चौधरी, दर्शना दुमडा, अशोक वडे, दामोदर पाटील, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व अधिकारी उपस्थित होते.

खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्यातील रिक्त पदे व अधिकारी वर्गाकडे गाड्या नसल्याबाबतची खंत व्यक्त केली. जी कार्यालय अजून जिल्ह्यात सुरू होऊ शकली नाहीत त्याकरिता आपण प्रयत्न करू असे ते पुढे म्हणाले.

या प्रसंगी जिल्ह्यत जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामाच्या आढावा घेणारी पुस्तिका तसेच खोडकीडा नियंत्रण महितीपत्रिकेचे या प्रसंगी विमोचन करण्यात आले.

 डिजिटल सात-बारा दाखले, कातकरी लाभार्थी ना दाखले वाटप, कुटुंबकल्याण कार्यक्रम अंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या केंद्र व अधिकाऱ्यांना, आरोग्य व महसूल विभागाच्या उल्लेखिनिय कामगिरी करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख