दक्षिणेत नवीन नेतृत्वाचा उदय...वायएसआर यांच्या कन्येकडून नव्या पक्षाची स्थापना - y s sharmila launches new political party ysr telangana party | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

दक्षिणेत नवीन नेतृत्वाचा उदय...वायएसआर यांच्या कन्येकडून नव्या पक्षाची स्थापना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय. एस. शर्मिला यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे. 

हैदराबाद  : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला (Y.S.Sharmila) यांनी वायएसआर तेलंगण पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला आहे. तेलंगणमध्ये 'राजन्ना राज्यम' म्हणजे राजशेखर रेड्डी यांचे सरकार आणण्याचा निर्धार शर्मिला यांनी केला आहे. राजशेखर रेड्डी यांच्या जन्मदिनी ८ जुलैलाच त्यांनी पक्षाची स्थापन केली. 

शर्मिल यांच्या पक्ष स्थापनेचा जंगी कार्यक्रम हैदराबादमध्ये झाला. या वेळी शर्मिला यांचा मोठ्या गर्दीसह रोड शो झाला आणि लेझर शोचा कार्यक्रमही झाला. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे राज्यात 100 दिवसांची पदयात्रा मी करणार आहे. या यात्रेत मी राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. 

तेलंगणमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, शर्मिला यांनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. शर्मिला यांच्या पाठीशी त्यांच्या मातोश्री वाय.एस. विजयालक्ष्मी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केला, त्यावेळीही विजयलक्ष्मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. शर्मिला आणि विजयालक्ष्मी यांनी पक्षस्थापनेच्या आधी वायएसआर यांच्या स्मारकाला भेट दिली होती. 

हेही वाचा : अनुप्रिया पटेल यांचे कमबॅक..ओबीसी मतांवर डोळा ठेवून मोदींची खेळी 

कन्येच्या नवीन पक्षाच्या स्थापनेवर विजयालक्ष्मी यांनी म्हटले आहे की, तेलंगणमधील जनतेची सेवा करण्याचा निर्णय माझ्या मुलीने घेतला याचा मला आनंद आहे. माझी मुलगी तिच्या पित्याप्रमाणेच खंबीर आहे. माझ्या पतीने मुलीला राजकुमारीप्रमाणे वाढवले आहे. तिला राजकारणात येण्याचे कोणतेही कारण नव्हते. ती केवळ वायएसआर यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राजकारणात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी हैदराबाद ते खम्मम अशी मोठी रॅली शर्मिला यांनी काढली होती. नंतर त्यांनी खम्मम येथे जाहीर सभा घेतली. शर्मिला यांनी त्यांचे वडील आंध्र प्रदेशचे (अविभाजित) माजी मुख्यमंत्री दिवंगत राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांची नुकतीच बैठक घेतली होती. ही बैठक त्यांनी त्यांच्या लोटस पाँड येथील निवासस्थानी घेतली होती. वायएसआर आणि विजयम्मा यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पक्षाची घोषणा होण्याची शक्यता आधी वर्तविण्यात आली होती. नंतर राजशेख रेड्डी यांच्या जन्मदिनाचा मुहूर्त पक्षस्थापनेसाठी निवडण्यात आला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख