नीलम गोऱ्हेंचा पुढाकार अन् साहित्यिक लक्ष्मण गायकवाडांचा वीज-पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला

साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी सपत्नीक सुरु केलेले उपोषण अखेर मागे घेतले आहे.
writer lakshman gaikwad cancels hunger strike after demands accepted
writer lakshman gaikwad cancels hunger strike after demands accepted

मुंबई : लक्ष्मण गायकवाड हे साहित्यिक असून, महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. लक्ष्मण गायकवाड यांच्या ताब्यात असलेल्या चित्रनगरीतील उपाहारगृहाच्या जागेसंदर्भात नियमांनुसार निर्णय घेऊन उपाहारगृहातील वीजपुरवठा  व पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

उपाहारगृह सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा यांनी डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करत तत्काळ वीज व पाणी पुरवठा सुरळीत केला. यानंतर गायकवाड यांनी चर्चेवर समाधान व्यक्त केले. तसेच, गायकवाड यांनी सपत्नीक सुरू असलेले उपोषण मागे घेतले असून, डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले.

लक्ष्मण गायकवाड यांच्या ताब्यात असलेल्या चित्रनगरीतील जागेसंदर्भात बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधानभवन येथे झाली. या वेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, साहित्यिक अर्जुन डांगळे, सक्षम अधिकारी तेजस समेळ तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

सरकारने १९९५ पासून गायकवाड यांच्या सन्मानार्थ चित्रनगरीत उपाहारगृहासाठी जागा दिली होती. यासंदर्भात 2017 नुसार भाडे देण्यास तयार असून, सध्या 1 लाख 50 हजार रुपये भाडे देत आहे. सध्या उपाहारगृह बंद असल्याने कामगार उपाशी आहेत. 2017 चा करार मान्य असून, नियमानुसार वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरु करुन सरकारने उपाहारगृह सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे गायकवाड यांनी बैठकीत सांगितले. भाडे थकबाकीबाबत नोटिसा देवून सुद्धा नियमांची पूर्तता न केल्याने उपाहारगृह बंद करुन वीजपुरवठा-पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या,  या जागेबाबत कायदेशीर व योग्य निर्णय घेऊन एका साहित्यिकाचे सनदशीर मार्गाने पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. गायकवाड यांना न्याय देण्यासाठी नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यात यावी. तसेच खंडीत करण्यात आलेला  वीजपुरवठा-पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा. उपहारगृह सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल व  गायकवाड यांना न्याय देण्यात येईल. नियमानुसार त्यांची मागणी पूर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दिले.

उपाहारगृह सुरु झाल्यानंतर शिवभोजन थाळी सुरु करण्याबाबत व पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी श्री.गायकवाड यांना सांगितले. यावर गायकवाड यांनी शिवभोजन थाळी सुरु करण्याबाबत व पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याबाबत मान्यता देऊन वीजपुरवठा-पाणीपुरवठा सुरु केल्यास उपोषण थांबविण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com