त्यावेळी फायझरच्या लशीला परवानगी दिली असती तर ही वेळ आलीच नसती! चेतन भगत बरसले

देशात कोरोनाचा कहर वाढला असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात लशीची टंचाई निर्माण झाली आहे.
writer chetan bhagat slams modi government over covid vaccine policy
writer chetan bhagat slams modi government over covid vaccine policy

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात लशीची टंचाई निर्माण झाल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. आता भारताने सर्वच विदेशी कंपन्यांना त्यांची लशीसाठी भारताने दारे खुली केली आहेत. यावरुन प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 

चेतन भगत यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, फायझरची लस ही सर्वांत चांगल्या लशींपैकी आहे. ती विकसित देशात वापरली जाते. फायझरने लशीला परवानगी द्यावी, अशी मागणी भारत सरकारकडे डिसेंबर 2020 मध्ये केली. परंतु, भारत सरकारने त्यांना  भारतात आणखी संशोधन करण्यास सांगितले. अखेर फेब्रुवारी 2021 मध्ये फायझरने परवानगी मागणारा अर्ज मागे घेतला. विचार करा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या लशीला परवानगी दिली असती तर किती जीव वाचले असते. 

फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांचा लशी अतिशय चांगल्या आहेत. त्या डिसेंबर 2020 पासून उपलब्ध आहेत. त्या अजूनपर्यंत भारतात का आल्या नाहीत? आपल्याला चांगल्या लशी नको आहेत का? आपण विदेशातून संरक्षण सामग्री खरेदी करीत नाही का? आताची परिस्थितीही युद्धासारखी नाही का? तर मग लस येथेच बनलेली असावी हा अट्टाहास कशासाठी, असे अनेक प्रश्न भगत यांनी उपस्थित केले आहेत. 

आता आपण सरसकट सगळ्या विदेशी लशींना परवानगी देऊ लागलो आहेत. कोणतीही खोटी प्रतिष्ठा जीव वाचवू शकत नाही. अशास्त्रीय मने देशाचे नुकसान करतात मग ती देशाबद्दल कितीही अभिमानी असोत, असा टोलाही भगत यांनी लगावला आहे. 

भगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता लशीसाठी आपल्याला जागतिक मदतीची गरज आहे. ज्याला मदत हवी असते त्याला खोटा अभिमान बाळगता येत नाही. खोट्या अभिमानाने कुणाचेही भले झालेले नाही. आपण तो बाळगला तर आपल्याला मदत मिळू शकणार नाही. त्यामुळे मान खाली घालून कामाला लागा, लस शोधा आणि ती नागरिकांपर्यंत पोचवा. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com