जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे गुजरातमध्ये उद्घाटन अन् त्याला नरेंद्र मोदींचे नाव!

जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन अहमदाबाद येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.
worlds biggest cricket stadium inaugurated in gujarat by president
worlds biggest cricket stadium inaugurated in gujarat by president

अहमदाबाद : येथील मोटेरा क्रिकेटचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याला आता जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आल आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन झाले. या स्टेडियमचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम होते. आता त्याते नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू , अमित शहांचे पुत्र व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे उपस्थित होते. अमित शहा हेसुद्धा आधी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 

नवीन नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनले आहे. उद्धाटन झाल्यानंतर आज लगेचच स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना सुरू झाला आहे. ही कसोटी सामना भारत आणि ब्रिटन यांच्यात आहे. अहमदाबाद शहरात सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलाचे उभारणी करण्याचे नियोजन असून, स्टेडियम हा त्यातील एक भाग आहे. 

या वेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या स्टेडियमची संकल्पना मांडली होती. हे स्टेडियम म्हणजे पर्यावरणपूरक विकासाचे उदाहरण आहे. 

या वेळी अमित शहा म्हणाले की, आ स्टेडियमची क्षमता 1 लाख 32 हजार आहे. एकाच वेळी एवढे लोक या स्टेडियममध्ये बसून क्रिकेट पाहू शकतात. हे जगातील सर्वांत मोठे स्टेडियम बनेल. सरदार वल्लभभाई पटेल क्रीड संकुल आणि नरेंद्र मोदी स्टेडियमच्या माध्यमातून अहमदबादची ओळख क्रीडाशहर अशी होईल. येथे ऑलिपिंकही होऊ शकेल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com