मैं परळी आ रही हूँ...दोन महिन्यांपूर्वीच तिने दिला होता धनंजय मुंडेंना इशारा - woman warned minister for social justice dhananjay munde before two months | Politics Marathi News - Sarkarnama

मैं परळी आ रही हूँ...दोन महिन्यांपूर्वीच तिने दिला होता धनंजय मुंडेंना इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने  बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू आहे.   

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. संबंधित महिलेने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन दोन महिन्यांपूर्वीच मुंडेंना इशारा दिल्याचे समोर आले आहे.  

तक्रारदार तरुणी ही मुंडे यांचे संबंध असलेल्या महिलेची बहीण आहे. या महिलेने दोन महिन्यांपूर्वी तिचा व धनंजय मुंडेंचा फोटो शेअर केला होता. याचबरोबर तिने फेसबुकवर धनंजय मुंडे यांचेच नाव लावले आहे. त्यावेळी तिला मुंडे यांच्या समर्थकांनी अनेक प्रश्न केले होते. ती कोण आहे, कशासाठी हे करीत आहे, ती आमच्या नेत्याला का बदनाम करीत आहे, असे प्रश्न विचारण्यात आले होते. यावर तिने म्हटले होते की, मी कोण आहे, हे आणखी दोन दिवसांत कळेल. मै परळी आ रही हूँ. 

आता त्या महिलेने फेसबुकवर नवीन पोस्ट केली आहे. यात तिने म्हटले आहे की, सत्य स्वत:च सिद्घ होत असते. जय श्री राम. सीता प्रत्येक युगात अग्निपरीक्षा देत आली आहे. आता मात्र, ती अग्निपरीक्षा देणार नाही.  

तक्रारदार तिने तक्रारीत म्हटले  होते की, बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा मुंडेंशी परिचय झाला होता. बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये मी एकटीच घरी असताना मुंडे आले होता. ते रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन ते लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्यांनी याचा व्हिडीओही तयार केला होता. 

मुंडे नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होते. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्यांनी दिले होते. अशा प्रकारे ते माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होता, असे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले होते.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख