नरेंद्र मोदी क्वारंटाइन होणार का..? - Will Narendra Modi be quarantined? | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी क्वारंटाइन होणार का..?

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वारंटाइन होणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे. 

नई दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. गेल्या पाच तारखेला राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वारंटाइन होणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे. 

महंत नृत्य गोपाल दास यांचे शिष्य अवधेश उपाध्याय यांनी सांगितले की गोपाल दास महाराज यांची तब्बेत खराब झाली असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपाल दास यांच्या उपचाराबाबत जिल्ह्याधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. महंत नृत्य गोपाल दास हे कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमासाठी मथुरा येथे उपस्थित होते. मंगळवारी मथुरा येथील सिताराम मंदिरात त्यांचा मुक्काम होता, असे त्यांचे शिष्य धर्मेद्र दास यांना सांगितले. 

संबंधित लेख