हिंदुत्वाच्या लढाईत आता बालाजी शिवसेनेला पावणार का?

बालाजी देवस्थानाला (Lord Balaji Temple) नवी मुंबईतील जागा देण्यासाठी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची लगबग
हिंदुत्वाच्या लढाईत आता बालाजी शिवसेनेला पावणार का?
Aditya Thackeray visits Balaji TempleSarkarnama

मुंबई : भोंगे, हनुमान चालिसा आणि त्यावरच्या भूमिकांनी हिंदुत्त्वाचे राजकारणाने टोक गाठत असतानाच नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदीर (Tirumala Temple) उभारणीला वेग देऊन हिंदुत्वाचा नवा पत्ता काढण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून सुरू झालेल्या राजकीय साठमारीत आता बालाजी शिवसेेनेला पावणार का, याची आता उत्सुकता आहे.

हिंदुत्त्वावरून एकमेकांचा पाणउतारा करण्याची स्पर्धा सध्या भाजप आणि शिवसेनेत लागली आहे. अशात युवा सेनेचे नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना तिरुपतीला नेऊन थेट मंदिराच्या जागेची कागदपत्रे देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात ठेवण्याची मोहीम शिवसेनेची सचिव मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) फत्ते केली. कोणत्या ना कोणत्या मंदिराचा मुद्या शिवसेनेच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली.

Aditya Thackeray visits Balaji Temple
‘राज’कारण तापलं अन् नार्वेकरांच्या हट्टापायी महत्वाची बैठक सोडून आदित्य ठाकरे दक्षिणेत

तिरुपती देवस्थानला व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी दहा एकर जागा देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणून तसा निर्णय आणि त्यानंतर लगेचच मंजुरी घेण्यात देवस्थान विश्वस्त आणि शिवसेनेच सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पुढाकार घेतला. या जागेच्या फाइलवर गुरुवारी (ता. २८ एप्रिल) सही होताच नार्वेकर यांनी आदित्य ठाकरेंना घेऊन शुक्रवारी (ता. 29) सकाळी दुपारीच तिरुपती गाठली. तिथे छोटेखानी 'इव्हेंट' घेऊन जागेबाबतचे पत्र देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डींकडे सोपविले. मंदिर उभारणीला हवे ते सहकार्य करण्याचा शब्द आदित्य यांनी रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या.

दुसरीकडे म्हणजे, मुंबईत शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक सोडून आदित्य अचानक दक्षिणेत का गेले, याची उत्सुकता होती. मात्र, भोंगे आणि हनुमान चालिसावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना नेतृत्वावर विशेषतः मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरच तुटून पडत आहे. ठाकरेंच्या सुरात सूर मिसळून भाजप नेतेही ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. या घडामोडीत आपणही हिंदुत्त्वाचा विचार करतो आहोत, हे दाखवून देण्यासाठी आदित्य यांनी तातडीने तिरुपतीकडे प्रयाण केले.

Aditya Thackeray visits Balaji Temple
मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही अयोध्या दौरा ठरला!

बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदाची जबाबदारी नार्वेकर यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वी आली. त्यांनी तातडीने दहा एकर जागेचा विषय निकाली काढला. याआधीही मुंबईत बीकेसीत जागेचा देण्याचा निर्णय बरगळल्याने आता फारसा वेळ न घालवता नार्वेकर यांनी मुंजरीची फाईल देवस्थानच्या ताब्यात दिली. त्यामुळे नार्वेकर यांचेही वजन तिरूपतीच्या वर्तुळात वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.