भाजपचे सरकार येणार? : फडणवीस यांनी वेगळ्या शब्दांत सांगितले..

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जोरदार भाषण
भाजपचे सरकार येणार? : फडणवीस यांनी वेगळ्या शब्दांत सांगितले..
Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीत जोरदार भाषण करत कार्यकर्त्यांत जोश पेटविण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारची तुलना ही अदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही यांच्याशी करत त्याविरोधात सर्व समाजाला एकत्र करून लढण्याचा निर्धार केला. भाजपचे सरकार येईल, पण कधी येणार हे डोक्यातून काढून टाका, असे सांगत सरकार येईल तो आपला बोनस समजा. आपल्याला शस्त्र घेऊन लढायचे आहे. आधी आगामी महापालिका निवडणूकांमध्ये यांना पाणी पाजू, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर फडणवीस हे तुटून पडले. काही शहरांत दंगली घडविण्याचा प्लॅन या सरकारमधील काही मंडळींनी आखला होता, असा आरोप त्यांनी केला.

सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे कोणतेच काम हे सरकार करत नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलवरचा कर कमी केल्यानंतर राज्य सरकारने काय केले? हे दर कमी व्हावेत म्हणून ही मंडळी सायकल मोर्चा काढत होते. मग आता पेट्रोल-डिझेलवरील कर का कमी केला नाही? गुजरातमध्ये राज्यापेक्षा 15 रुपयांनी दर कमी आहेत? मग इथे का स्वस्त दराने इंधन मिळत नाही. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे आले नाहीत, असे फक्त बोलत राहण्याचे काम हे सरकार करत आहे. इतर राज्ये यांच्यासारखे रडत नाहीत. आपले अपयश लपविण्यासाठी रोज नवीन बहाणा शोधला जातो. आजची अवस्था अतिशय वाईट आहे, असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस, फ्रान्सचा मॉरीस कोंबडा अन् गरूडावर बसलेला डोमकावळा

या सरकारला तर विदर्भ, मराठवाड्याचा तिटकारा आहे. मराठवाड्याच्या चालू योजना बंद आहेत. वैधानिक विकास मंडळांबाबत विदर्भ, मराठवाड्याचा एकही मंत्री बोलायला तयार नाही. अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही महाराष्ट्रावर तुटून पडत होते. या सरकारच्या विरोधात सर्व समाजाला एकत्र घेऊन या सरकारच्या विरोधात लढावे. लढा उभारावा लागेल. सामान्य माणसाची ताकद दाखवावी लागले. बूथ अॅक्टिव्ह करावा लागेल. येत्या काळात अनेक कार्यक्रम आपल्याला करायचे. येईल तर बोनस. जनतेकरता लढायला उतरायचा निर्धार आपण करू या. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या सर्वांना पाणी पाजू. त्यानंतर स्वतःच सरकार आणून दाखवू. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in