मुंबई बाजार समिती सभापतीपदासाठी सुधीर कोठारी आघाडीवर ; ३१ ऑगस्ट रोजी निवडणुक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्यानिवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व राखले आहे. १८ पैकी १६ संचालक आघाडीचे आहेत. यामध्ये एक शिवसेना व एक बंडखोर तर ४ काँग्रेस आणि ८ राष्ट्रवादीशी निगडित उमेदवार निवडून आले आहेत.मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत राज्यातला महाविकासआघाडीचा निवडणुकीतील प्रयोग यशस्वी झाला आहे.
Who will be next Chairman of Mumbai Market Committee
Who will be next Chairman of Mumbai Market Committee

पुणे : राज्यातील आर्थिकदृष्ट्या महत्वाचे सत्ता केंद्र असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड ३१ आॅगस्ट रोजी होत आहे. या निवडीत कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष्य लागले असून, निवडीमध्ये वर्धा बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांचे नाव आघाडीवर आहे. माजी सभापती बाळासाहेब सोळसकर देखील प्रयत्निशील असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

कोठारी यांनी वार्षिक दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या हिंगणघाट (जि.वर्धा) बाजार समितीचे कामकाज कार्यक्षमपणे चालविले असून, राज्यातील उत्तम बाजार समिती म्हणून ही समिती ओळखली जाते. केवळ २० कर्मचाऱ्यांमध्ये बाजार समिती चालविण्याचे कोठारी यांचे कौशल्य असल्याने त्यांची मुंबईच्या सभापतीपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला राष्ट्रवादीच्या एका आमदारांनी दुजोरा दिला आहे. 

सभापतीपदासाठी पुणे विभागातुन निवडून आलेले साताऱ्याचे बाळासाहेब सोळसकर देखील प्रयत्नशील आहेत.  त्यांनी सभापदीपदी काम केले असून, त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. हा मुद्दा त्यांना अडचणींचा ठरू शकतो. बाजार समितीची निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. 

या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व राखले आहे. १८ पैकी १६ संचालक आघाडीचे आहेत. यामध्ये एक शिवसेना व एक बंडखोर तर ४ काँग्रेस आणि ८ राष्ट्रवादीशी निगडित उमेदवार निवडून आले आहेत. फळ विभागाचे संजय पानसरे बिनविरोध निवडून आले आहेत. तर कामगार प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. ६ महसूल आणि ४ व्यापारी मतदारसंघात हे संचालक निवडण्यात आले आहेत. मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत राज्यातला महाविकासआघाडीचा निवडणुकीतील प्रयोग यशस्वी झाला आहे.

हिंगणघाट बाजार समिचीचे उल्लेखनीय काम

-  शेतकऱ्यांना १ रुपयांत जेवण आणि निवास व्यवस्था

- शेतकऱ्यांना एसटी स्थानक ते बाजार समिती मोफत बससेवा

- शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे १ हजार रुपयात विवाह
- शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी ७५ टक्के अनुदानावर लॅपटॉप

- शेतकऱ्यांसाठी मोफत पाणंद रस्ते योजना

.....यासाठी सोळसकर पिछाडीवर

सध्याचे सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील, (प्रभारी सध्या जयंत पाटील आहेत) राज्यमंत्री शंभुराज देसाई, माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील हे मुंबई बाजार समितीशी निगडीत सर्व नेते सातारा जिल्ह्यातील आहेत. यामुळे सभापतीपद पुन्हा सातारा जिल्ह्यालाच का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद असून, विदर्भात पक्षाला ताकद देण्यासाठी कोठारी यांच्या नावावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

आज शशिकांत शिंदे घेणार आढावा

सभापती निवडीबाबत आज मुंबईत सभापती निवडीबाबत शशिकांत शिंदे आढावा घेणार असून अंतिम नावे पक्ष श्रेष्ठी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे देणार असल्याचे समजते

महसूल विभाग विजयी उमेदवार

अमरावती : प्रवीण देशमुख, माधवराव जाधव ( महाविकास आघाडी)

कोकण विभाग : प्रभु पाटील (अपक्ष) राजेंद्र पाटील (महाविकास आघाडी)

पुणे विभाग : बाळासाहेब सोळस्कर (महाविकास आघाडी)धनंजय वाडकर ( महाविकास आघाडी)

नागपूर विभाग : हुकूमचंद आमधरे (महाविकास आघाडी) सुधीर कोठारी ( महाविकास आघाडी)

नाशिक विभाग : जयदत्त होळकर ( महाविकास आघाडी ) अद्वैत हिरे ( अपक्ष)

औरंगाबाद : वैजनाथ शिंदे, अशोक डक ( महाविकास आघाडी)

व्यापारी विभाग -कांदा बटाटा विभाग : अशोक वाळुंज (महाविकास आघाडी)

भाजीपाला विभाग : शंकर पिंगळे (अपक्ष )

भुसार विभाग : निलेश विरा (अपक्ष)

मसाला विभाग : विजय भुता (अपक्ष )

माथाडी मतदार संघ : शशिकांत शिंदे (महाविकास आघाडी)

फळ विभाग : संजय पानसरे - बिनविरोध (महाविकास आघाडी )
Edited By - Amit Golwalkar 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com