जावडेकर बिनकामाचे तर 'एएस' अतिशय महत्वाचे; गोस्वामींच्या चॅटमधील गौप्यस्फोट

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
whats app chat between arnab goswami and partho dasgupata leaked
whats app chat between arnab goswami and partho dasgupata leaked

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅटची पन्नासहून अधिक पाने उघड झाली आहे. यातून भाजपच्या नेत्यांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांना थेट आव्हान दिले होते. दरम्यान, अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन दिला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. या प्रकरणी अटक झालेले ते पंधरावे आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅटमधून भाजप नेत्यांबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. अनेक गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

प्रतिस्पर्धी वाहिन्यांना मागे टाकण्यासाठी आणि रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी गोस्वामी आणि दासगुप्ता यांनी रणनीती आखल्याचेही समोर आले आहे. केंद्रीय व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना या चॅटमध्ये बिनकामाचे म्हटले आहे. याचबरोबर इंडिया टीव्हीचे रजत शर्मा यांची टिंगलटवाळीही करण्यात आली आहे. शर्मांना पंतप्रधान कार्यालयात कोणताही थारा नसल्याचेही गोस्वामींना म्हटले आहे. 

याचबरोबर या चॅटमध्ये 'एएस' असा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. 'एएस' यांना भेटत असल्याचे गोस्वामींनी दासगुप्ता यांना सांगितले होते. त्यावेळी मला पंतप्रधान कार्यालयात माध्यम सल्लागार म्हणून जबाबदारी मिळेल का, अशी विचारणा दासगुप्ता यांनी गोस्वामींना केल्याचा उल्लेखही चॅटमध्ये आहे. विशेष म्हणजे, 15 ऑक्टोबर 2019 रोजीचे हे चॅट असून, त्याच दिवशी अमित शहांची मुलाखत गोस्वामींनी घेतली होती.   

दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट हे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी उघड केले होते. त्यांनी याबाबत ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, बीएआरसीचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील हे व्हॉट्सअॅप चॅट आहे. यातून अनेक कटकारस्थाने आणि सरकारी यंत्रणांमधील त्यांचा अनिर्बंध शिरकाव समोर येत आहे. प्रसारमाध्यम आणि पदाचा वापर करुन झालेली सत्तेची दलाली यात दिसून येत आहे. देशात कायद्याचे राज्य शिल्लक असेल तर तो आधीच कारागृहात असालयला हवा होता.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com