एकनाथ शिंदेंनी कोणते आश्वासन दिले की राजेश क्षीरसागरांनी क्षणात शिवबंधन तोडले...

राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना हुकलेल्या मंत्रीपदाची अपेक्षा
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
Eknath Shinde | Rajesh Kshirsagar Sarkarnama

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचीही वर्दी शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात लागली. त्यामुळे कोल्हापूरमधील समीकरणे बदलली आहे. उद्धव ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या क्षीरसागरांनी गुरू मानलेल्या एकनाथ शिंदेचे आता बोट धरले आहे. (Eknath Shinde Latest news)

क्षीरसागर यांना एकनाथ शिंदे यांचा गुरूवारी सकाळीच फोन झाला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेवून येथून थेट मुंबई गाठली. तेथे कुटुंबियांना ठेवून ते सायंकाळी गुवाहटीकडे विमानाने रवाना झाले. श्री. क्षीरसागर यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ही शिवसेनेत थेट कॅबिनेट मंत्री दर्जाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद क्षीरसागर यांना देण्यात आले. राजकरणातून बाजूला फेकले जावू नये यासाठी हे पद महत्वाचे ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात असलेल्या क्षिरसागर यांना राज्यातील नियोजनात सहभागी होता आले. मात्र आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आघाडी धर्म पाळण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्यामुळे त्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागला. दोन वेळा आमदार होऊन मंत्री पदाची संधी हुकल्याची खंत क्षीरसागर यांच्यात होती.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून तूर्त अभय; नेतेपदी कायम!

बंडखोरीचे नाट्य सुरू असताना कोल्हापुरातील पाच माजी आमदार गोव्यात होते. सर्वजण थांबा, पहा आणि जा अशी स्थितीत असल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नाट्यमय घडामोडीत ही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला होता. ते गुरूवारी (ता. 23 जून) मुंबईला जाणार असल्याचे नियोजन निश्‍चित होते.

मात्र त्याच दिवशी सकाळी शिंदे यांचा फोन आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेवून दोन वेळा मंत्रीपद हुकल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर शिंदे यांनी निधी दिल्यामुळे कोल्हापुरातील कामे करता आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी चक्रव्युह भेदण्यासाठी काही निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले आणि कुटुंबियांसमवेत त्यांनी मुंबई गाठली. तेथून ते थेट गुवाहटीकडे विमानाने रवाना झाले. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसेनेचा आणखी एक नेता शिंदे गटात दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातही बंडखोरी झाल्याचे दिसून आले.

Eknath Shinde | Rajesh Kshirsagar
एकनाथ शिंदेंसह ८ बंडखोरांची मंत्रीपदे धोक्यात; तातडीने हकालपट्टीचे संकेत

उद्धव ठाकरे दैवत, एकनाथ शिंदे गुरू
पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे दैवत आहेत, तर मंत्री एकनाथ शिंदे गुरू असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले होते. मंत्रिपदाची हुकलेली संधी मिळेल, या आशेने ते शिंदे गोटात गेल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

दोन्ही खासदार शिवसेनेतच
खासदार संजय मंडलीक आणि खासदार धैर्यशील माने दोघेही सुद्धा शिवसेनेचे आहेत. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर ते दोघेही मुंबईत होते. या सर्व घडामोडीतही ते शिवसेनेतच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचे दिसून येते. तर जिल्ह्यातील माजी आमदार पुढे काय करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com