पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचं होणार काय? वाद सर्वोच्च न्यायालयात

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आठ टप्प्यांत होणार आहे. यावरुन मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
west bengal eight phase election schedule challenged in supreme court
west bengal eight phase election schedule challenged in supreme court

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. याला विरोध करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केले होते. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यामुळे बंगालमधील निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्याच्या निवडणूक आयोगाला निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत ॲड.एम.एल. शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा घटनेचे कलम १४ (जगण्याचा हक्क) आणि कलम २१ चे उल्लंघन करणारे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 

निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा कार्यक्रमाची घोषणा केली. पश्‍चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

या याचिकेत म्हटले की, पश्‍चिम बंगालमध्ये धार्मिक घोषणाबाजी केली जात आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत. जय श्रीराम आणि अन्य धार्मिक घोषणा दिल्या जात असल्याचे सामाजिक सलोखा बिघडत आहे. ही बाब भारतीय दंड विधान आणि लोक प्रतिनिधी कायदा १९५१ चे उल्लंघन आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

पश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम : 
मतदान : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 

मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com