नरेंद्र मोदी अन् अमित शहांना विचारुन निवडणुकीच्या तारखा ठरवल्या का?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
west bengal cm mamata banerjee targets narendra modi and amit shah
west bengal cm mamata banerjee targets narendra modi and amit shah

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च  ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. या तारखांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना धारेवर धरले आहे.

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

राज्यातील निवडणुका आठ टप्प्यांत घेण्याबद्दल ममतांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, भाजपची निवडणूक प्रचार मोहीम डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसारच हे घडले असावे, असा माझा संशय आहे. निवडणूक आयोगाने राज्याकडे भगव्या नजरेतून पाहू नये. मी निवडणूक आयोगाचा आदर करते. पंरतु, माझे काही प्रश्न आहेत. इतर राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना बंगालमध्ये एवढ्या टप्प्यात निवडणूक का?  निवडणूक आयोगच जर न्याय देऊ शकत नसेल तर लोकांनी जायचं कुठे? निवडणूक आयुक्तांनी बंगालकडे त्यांचे स्वत:चे राज्य म्हणून पाहावे. 

निवडणूक आयोगाने आमचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगण्याचे तीन भाग केले आहेत. असे कधीही घडले नव्हते. या सर्व खेळी केंद्र सरकारने खेळल्या तरी शेवटी विजय हा आमचाच होणार आहे. माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला हव्या त्या तारखेला निवडणुका घेतल्या जात आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सूचनेनुसार हे होत आहे का? राज्यांच्या निवडणुकांत ते अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करु शकत नाहीत. निवडणूक आयोगाने सत्ता आणि पैशाचा निवडणुकीत वापर रोखावा, असे ममतांनी म्हटले आहे.  

निवडणूक तारखा : 
मतदान : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 

मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com