अपमान करायचा होता तर बोलावता कशाला? संतप्त ममतांनी मोदींसमोरच सुनावले

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली.
west bengal cm mamata banerjee says dont insult after inviting
west bengal cm mamata banerjee says dont insult after inviting

कोलकता : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त आज पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्या संतापल्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत भाषण बंद केले. 

आज सकाळी कोलकत्यामध्ये पदयात्रा काढत ममतांनी भाजपवर निशाणा साधला. निवडणुका जवळ आल्याने भाजपला नेताजींची आठवण येत आहे, असा टोला त्यांनी लगावला. आजच्या व्हिक्टोरिया मेमोरियल कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले. परंतु, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. 

ममता या बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे त्या संतापल्या. त्या म्हणाल्या की, हा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमात शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे. कोलकत्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून त्याचा अपमान करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला. 

या वेळी बोलताना मोदी म्हणाले की, देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज हयात असते तर त्यांना भारताचा अभिमान वाटला असता. संकटाच्या काळामध्येही भारत जगाच्या मदतीला धावून गेला असून कोरोना महामारीच्या काळामध्ये तो अन्य देशांना लशींचा पुरवठा करतो आहे. भारताचे हे काम पाहून नेताजींचा ऊर अभिमानाने भरून आला असता. 

मोदींच्या हस्ते या वेळी नेताजींना अभिवादन म्हणून विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. मोदी म्हणाले की, आजच्या दिवशी केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला नव्हता तर भारताचा आत्मसन्मान जन्माला आला होता. याच नेताजींना जगाच्या महासत्तेला ठणकावून सांगितले होते की मी स्वातंत्र्य मागणार नाही तर ते हिसकावून घेईल. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com