मोदी सरकारचा प्रवास :'व्होकल फॉर लोकल' ते जागतिक मदतीवर विसंबून

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार रुग्ण सापडले आहेत.
vocal for local modi government relies on global aid for covid pandemic
vocal for local modi government relies on global aid for covid pandemic

मुंबई : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील वर्षी 'व्होकल फॉर लोकल'ची घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता जागतिक मदतीवर मोठ्या प्रमाणात विसंबून असल्याचे चित्र आहे.   

मोदी सरकारने मागील वर्षी देशातील उद्योगांना संरक्षण देण्याची भूमिका घेत 'व्होकल फॉर लोकल'ची घोषणा केली होती. आता देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारवर इतर देशांकडे मदत मागण्याची वेळ आली आहे. 

अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी भारताला मदत करण्यास सुरवात केली आहे. भारतासोबत सीमेवर तणाव असतानाही शेजारी असलेली चीन मदतीसाठी धावून आला आहे. अमेरिकेकडून भारताला ऑक्सिजन, लशीचा कच्चा माल, रेमडेसिव्हिरची मदत केली जाणार आहे. 

जगातून भारतासाठी मदतीचा ओघ 
अमेरिका :
सिरमला लशीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा, ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा, रेमडेसिव्हिर, सीडीसीचे कृती पथक भारतात येणार  
ब्रिटन : 600 आवश्यक वैद्यकीय उपकरणे, 495 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 120 नॉन-इव्हेजिव्ह व्हेंटिलेटर, 20 मॅन्युएल व्हेंटिलेटर 
आयर्लंड : 365 व्हेंटिलेटर, 700 ऑक्सिन कॉन्सन्ट्रेटर्स 
स्वीडन : 130 व्हेंटिलेटर 
लक्झेम्बर्ग : 58 व्हेंटिलेटर 
रोमानिया : 80 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 
बेल्जियम आणि पोर्तुगाल : रेमडेसिव्हिर 
जर्मनी : 23 मोबाईल ऑक्सिजन जनरेशन प्लांट, 120 व्हेंटिलेटर, 8 कोटी केएन 95 मास्क 
फ्रान्स : 8 ऑक्सिजन जनरेटर (यातील प्रत्येक जनरेटर पुढील 10 वर्षे 250 खाटांच्या रुग्णालयाला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करु शकेल), 5 मेडिकल ऑक्सिजनचे कंटेनर, 28 व्हेंटिलेटर, 200 इलेक्ट्रिक सिरींज पंप, ब्रीदिंग मशिन, आयसीयू उपकरणे 
जागतिक आरोग्य संघटना : 400 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, मोबाईल फिल्ड हॉस्पिटल्स,  तपासणीसाठी प्रयोगशाळांना साहित्य पुरवठा, देशात सध्या डब्लूएचओचे 2 हजार 600 तज्ञ काम करीत आहेत. 
ऑस्ट्रेलिया : 500 व्हेंटिलेटर, 10 लाख सर्जिकल मास्क, 5 लाख पी2 आणि एन 95 मास्क, 1 लाख गॉगल, 1 हजार ग्लोव्ह्ज, 20 हजार फेस शिल्ड 
सिंगापूर : 500 बीआयपीएपी, 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर 
हाँगकाँग : 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स 
थायलंड : 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक 
सौदी अरेबिया आणि यूएई : 80 द्रवरुप ऑक्सिजन, 6 क्रायोजेनिक  ऑक्सिजन कंटेनर 

देशात 24 तासांत 3 हजार 645 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 4 हजार 832 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार 257 रुग्ण सापडले असून, 3 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com