वाराणशीत जाऊन मोदींकडून निवडणुकीचा शंखनाद!

काशीत आठ हजार कोटींचे विकास प्रकल्प सुरू.
omdi.jpg
omdi.jpg

नवी दिल्ली : तब्बल आठ महिन्यांनंतर वाराणसीच्या होमग्राउंडवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दीड हजार कोटींपेक्षाही अधिक किमतीच्या विकासकामांचा शुभारंभ करताना विधानसभेच्या आगामी निवडणुकीचा शंखनाद केला. कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट यशस्वीरीत्या थोपविल्याबद्दल त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची मुक्तकंठाने प्रशंसाही केली. योगींचे हे काम अभूतपूर्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Modi's election rally) 

मोदी म्हणाले, ‘‘ भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला दूर सारत योगी आदित्यनाथ यांनी केवळ विकासावर भर दिला. यूपीमध्ये त्यांनी कायद्याचे राज्य आणले.’’ जपान सरकारच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या रुद्राक्ष भवनचे देखील मोदींच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

कोरोना परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मोदींनी योगी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले,  ‘‘ अनेक देशांचा विचार केला तर उत्तरप्रदेशची लोकसंख्या ही त्यांच्यापेक्षाही दुप्पट असल्याचे दिसून येते. पण ज्या पद्धतीने योगींना कोरोना संसर्ग हाताळला ते सगळेच अभूतपूर्व होते. याआधी केवळ आरोग्य सुविधा नसल्याने छोट्या समस्या देखील गंभीर रूप धारण करत असत, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव देखील त्याला कारणीभूत होता. संकटाच्या काळामध्ये देखील काशीने न थकता झुंज दिली. कधीकाळी यूपीमध्ये माफियाराज आणि दहशतवाद होता, त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. आता सगळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आता माफ केले जाणार नाही.’’ असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले…
- विकासवादामुळे लोकांना योजनांचा फायदा.
- राज्यातील गुंतवणूक, रोजगार वाढत आहे.
- काशी पूर्वांचलमधील मेडिकल हब होते आहे.
- विकासाच्या मार्गावर काशीची ओळख कायम राहील.
- काशीत आठ हजार कोटींचे विकास प्रकल्प सुरू.
- पायाभूत सुविधांवर योगी आदित्यनाथांचा भर. 

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com