अशोक चव्हाणांचे वक्तव्य म्हणजे 'नाचता येईना अन् अंगण वाकडे' : विनायक मेटे

औरंगाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलन ठिकाणी सोमवारी पोलिसांनी अचानक मराठा आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हा प्रकार दुर्दैवी असून, या घटनेचा आमदार विनायक मेटे यांनी निषेध केला. यामुळे मराठा समाज संतापलेला आहे. या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून मराठा समाजासाठी काहीही केले नाही. संपूर्ण मराठवाड्यात या कारवाईने संतापाची लाट असल्याचे विनायक मेटे म्हणाले.
Vinayak Mete Criticism on Ashok Chavan Over Maratha Reservation
Vinayak Mete Criticism on Ashok Chavan Over Maratha Reservation

बीड  : ''मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. आमच्या आंदोलनाला ते भाजपचे नाव जोडत आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत, उगाच हवेमध्ये गोळ्या मारण्यात काय अर्थ. त्यांचे वक्तव्य म्हणजे नाचला येईना अन् अंगण वाकडे,'' असे असल्याचा पलटवार मराठा अरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

ते म्हणाले, "मंत्री अशोक चव्हाण यांचे न्यायालयात चुकत असल्याचा मराठा आरक्षण समन्वय समितीचा दावा आहे. न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी नको असे आमचे मत पूर्वीपासून होते. प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावे, एकत्रित सुनावणी घ्यावी अन् वकील नेमण्यातही त्याच चुका केलेल्या आहेत असे आमचे खात्रीशीर सांगणे आहे. अशोक चव्हाण यांच्या चुकांमुळेच नोकरभरती थांबली आहे. यात नेमका भाजपचा कट कोणता, षडयंत्र कोणते, भाजपचा पुरस्कृतपणा कोणता हे त्यांनी स्पष्ट करावे,''

मेटे पुढे म्हणाले, "त्यांच्याच मनामध्ये आरक्षणाबद्दल, मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत हे पाप आहे का, हे चव्हाण यांनी स्पष्ट करावे. आपण अगोदरही आघाडी सरकार असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करायचो, गेली ३० वर्षांपासून कोणतेही सरकार असो मी मराठा समाजाच्या प्रश्नावर सातत्याने सरकारला जाब विचारला आहे. आताही तेच काम करत आहे." अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाही मी राष्ट्रवादीत असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर संघर्ष केलेला आहे. मग आता कोणता बदल झालाय असा सवालही मेटे यांनी केला.

आंदोलकांच्या अटकेचा निषेध
औरंगाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलन ठिकाणी सोमवारी पोलिसांनी अचानक मराठा आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हा प्रकार दुर्दैवी असून, या घटनेचा आमदार विनायक मेटे यांनी निषेध केला. यामुळे मराठा समाज संतापलेला आहे. या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून मराठा समाजासाठी काहीही केले नाही. संपूर्ण मराठवाड्यात या कारवाईने संतापाची लाट असल्याचे विनायक मेटे म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com