सेनेत पुन्हा भडका? : उपराष्ट्रपती निवडणुकीत पाच खासदारांनी मतदान टाळले..

Vice president election 2022 : सेनेने काॅंग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला होता...
Rajan Vichare And Uddhav Thackeray
Rajan Vichare And Uddhav Thackeraysarkarnama

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Vice President election 2022) शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज मतदान केले नाही. त्यात लोकसभेतील पाच तर राज्यसभेतील एक खासदार यांचा समावेश आहे. राज्यसभेतील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मात्र उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या लोकसभेतील इतर पाच खासदारांनी मतदान टाळल्याने तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेल्या खासदारांपैकी फक्त ओमराजे निंबाळकर यांनीच मतदान केले.

Rajan Vichare And Uddhav Thackeray
Tejas Thackeray राजकारणात येणार? आता आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...

शिवसेनेने काॅंग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बारा खासदारांनी भाजपचे उमेदवार जगदिप धनकड यांना पाठिंबा दिला होता. शिंदे गटाच्या सर्व बारा आमदारांनी मतदान केले. यातील श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने हे मतदान केल्यानंतर वाराणसी येथे दर्शनाला गेले.

शिवसेनेचे प्रतोद राजन विचारे, विनायक राऊत, अरविंद सावंत गजानन किर्तीकर आणि संजय जाधव यांनी मतदान टाळले. त्यातील राऊत आणि जाधव यांनी आजारी असल्याचे कारण दिल्याचे समजते. किर्तीकर आधीपासूनच आजारी आहेत. इतर दोघांचे मतदान न करण्याचे कारण समजू शकले नाही.

Rajan Vichare And Uddhav Thackeray
आदित्य ठाकरेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग; मुंबईतील शाखाप्रमुखांना महत्त्वाचे आदेश

उपराष्ट्रपती पदाचे मतदान टाळण्यामागे काही राजकीय कारण आहे का, याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. काॅंग्रेससोबत न जाण्याचे शिवसेनेचे हे संकेत आहेत का, असेही बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महाविकास आघाडी अशी राज्यात एकत्र राहिलेली नाही. ठाकरे, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हे तिघेही वेगवेगळ्या दिशेने असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातूनच मग शिवसेनेच्या खासदारांनी काॅंग्रेस उमेदवाराला मतदान देण्यापेक्षा अनुपस्थित राहण्यास प्राधान्य दिले.

Rajan Vichare And Uddhav Thackeray
'शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि ठाकरे यांचा उद्धव गट'

धनकड मोठ्या मताधिक्याने विजयी

भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड हे अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजयी झालेत. 71 वर्षीय धनखड यांना पाहिल्या पसंतीची तब्बल 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काॅंग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते बाद झाली. लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी आज रात्री 7 वाजून 50 मिनीटांनी धनखड यांच्या विजयाची घोषणा अधिकृतरीत्या केली. त्यांच्या विजयामुळे लोकसभा व राज्यसभेचे पीठासीन अधिकारी एकाच राज्यातील (राजस्थान) असल्याचा, उंबराच्या फुलासारखा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com