काँग्रेसनं जुळवून घेतलं अन् भाजपमध्ये सुरू झाला हाय होल्टेज ड्रामा

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी मंगळवारी सुरू केलेली धार्मिक यात्रा त्यासाठी निमित्त ठरले आहे.
काँग्रेसनं जुळवून घेतलं अन् भाजपमध्ये सुरू झाला हाय होल्टेज ड्रामा
Vasundhara Raje in YatraSarkarnama

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद संपल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पायलट यांनी आनंद व्यक्त करत वादावर पडदा टाकला आहे. पण काँग्रेसमधील (Congress) वाद संपलेला असताना भाजपमध्ये (BJP) हाय होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. त्यामुळे राजस्थानमधील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे (Vasundhara Raje) यांनी मंगळवारी सुरू केलेली धार्मिक यात्रा त्यासाठी निमित्त ठरले आहे. राजे यांनी मेवाड येथून ही यात्रा सुरु केली आहे. या यात्रेत त्या 25 नोव्हेंबरपर्यंत सहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये जाण्यास सभाही घेणार आहेत. कोरोना काळात मृत्यू झालेल्या पक्षाच्या नेत्यांनाही अभिवादन करणार आहेत. यात्रा सुरू करताना राजकारणापेक्षा धर्मकारणावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

Vasundhara Raje in Yatra
पराभवानंतर भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

राजस्थानमधील दोन पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राजेंनी ही यात्रा काढली आहे. त्यामुळे या यात्रेचा धसका भाजपच्या इतर नेत्यांनी घेतला आहे. राजस्थानमध्ये 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. राजे या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. पण भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता शक्तीप्रदर्शन करण्यास सुरूवात झाल्याची चर्चा आहे.

राजे यांनी यात्रा सुरू केलेला मेवाड हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. राजे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांचा या मतदारसंघात दबदबा आहे. कटारिया यांना या यात्रेची माहितीही देण्यात आलेली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. तर राज्यभरातील राजेंचे अनेक समर्थक पुन्हा सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. राजपालसिंग शेखावत, प्रताप सिंग शिंगवी, प्रल्हाद गुंजाळ, बी. एस. राजावत आणि अशोक परनामी यांच्यासारखे नेते या यात्रेमध्ये दिसणार आहेत.

Vasundhara Raje in Yatra
चर्चा तर होणारच : लशीचे दोन्ही डोस घेतल्यास दारूवर मिळवा 10 टक्के सवलत

राजे यांच्याकडून या यात्रेतून पक्षाला एकप्रकारे इशारा दिला जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे सांगतात. मागील अनेक कार्यक्रमांमध्ये राजे यांच्या व्यासपीठावर पक्षाचे चिन्हही दिसले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चाही जोरदार सुरू आहेत. त्यातच त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता यात्रा काढली आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in