वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसनं टाकली महत्वाची जबाबदारी

देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेसनंही जोरदार तयारी सुरूकेली आहे.
Varsha Gaikwad in Screening Committee for UP elections
Varsha Gaikwad in Screening Committee for UP elections

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेसनंही जोरदार तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे महत्वाचं राज्य आहे. या राज्यावर भाजपसह काँग्रेसनंही जोर दिला आहे. याच राज्यासाठी काँग्रेसनं महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाकली आहे. (Varsha Gaikwad in Screening Committee for UP elections)

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) मैदानात उतरल्या आहेत. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना ऐनवेळी उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा करिष्मा फारसा चालला नाही. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मात्र प्रियांका यांनी कंबर कसली असून इतर राज्यांतील तरूण नेत्यांनाही उत्तर प्रदेशातील निवडणुकीची महत्वाची जबाबदारी दिली जात आहे.

काँग्रेसकडून शुक्रवारी उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी छाननी समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये वर्षा गायकवाड यांना स्थान देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते जितेंद्र सिंग हे समितीचे अध्यक्ष असतील. खासदार दिपेंदर सिंग हुडा हेही या समितीमध्ये आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये उमेदवार निवडीचं काम आव्हानात्मक आहे. त्यामुळे छाननी समितीवर मोठी जबाबदारी राहणार आहे. 

वर्षा गायकवाड यांनी 2017 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांच्याकडं मोठी जबाबदारी देण्यात आली होती. दिवंगत राजीव सातव यांच्यासोबत त्यांनी गुजरातमधील अनेक मतदारसंघ पिंजून काढले होते. काँग्रेस गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या टीममध्येही त्यांचा समावेश करण्यात आल्याचे दिसून येते. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडे सध्या 403 पैकी 312 जागा आहेत. सध्यातरी भाजपचा वरचष्मा दिसत असला तरी शेतकरी आंदोलन, कोरोना काळात राज्य सरकारला आलेले अपयश, बेरोजगारी असे अनेक मुद्दे भाजप सरकारच्या विरोधात आहेत.  काँग्रेसकडून निवडणुकीदरम्यान हे मुद्दे उपस्थित केले जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com