शशिकला उद्या सुटताहेत...तमिळनाडू राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर

शशिकला यांची या महिन्यात कारागृहातून सुटका होत आहे. त्यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
v k sasikala wil be released from jail tomorrow says ttv dinakaran
v k sasikala wil be released from jail tomorrow says ttv dinakaran

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची उद्या (ता.27) सुटका होत आहे.  त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना20 जानेवारील उपचारासाठी बंगळूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्या त्यांची सुटका होईल, अशी शक्यता आहे. त्याआधीच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याचबरोबर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती.   

शशिकला या मागील तीन दशके त्या जयललितांसोबत पोएस गार्डनमधील वेदा निलायम निवासस्थानामध्ये राहत होत्या. आता त्यांचा नवीन पत्ता ही त्यागराजनगरमधील असणार आहे. त्यांची पुतणी कृष्णप्रिया हिच्या घरापासून थोड्याच अंतरावर शशिकलांचे नवीन निवासस्थान आहे. शशिकला या 2017 मध्ये पॅरोलवर सुटल्या होत्या त्यावेळी त्या पुतणीच्याच घरी राहिल्या होत्या. 

शशिकलांच्या सुटकेबाबत त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शशिकला या उद्या कारागृहातून सुटत आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता मात्र, त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. त्यांना रुग्णालयातून सोडण्याबाबत आम्ही डॉक्टरांशी चर्चा करुन आणि नंतर त्यांना चेन्नईला आणण्याचा निर्णय घेऊ. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जाण्याआधी शशिकलांनी विश्वासू सहकारी असलेले पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. नंतर तेच शशिकलांच्या विरोधात गेले. आता त्यांनी थेट शशिकलांना आव्हान दिले आहे. नुकतेच पलानीस्वामी म्हणाले होते की, शशिकलांना आम्ही अण्णाद्रमुध्ये प्रवेश देणार नाही. शशिकला म्हणजे काय पक्ष आहेत का? त्यांच्या सुटकेने काहीही फरक पडणार नाही. टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या पक्षातील बहुतांश नेते आता अण्णाद्रमुकमध्ये परतले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com