ते महापापी, जाहीर माफीशिवाय घरवापसी नाही! काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भडकले

इतर पक्षांतील उमेदवारांना गळाला लावण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे.
ते महापापी, जाहीर माफीशिवाय घरवापसी नाही! काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भडकले
BJP, CongressFile Photo

नवी दिल्ली : देशात पुढील वर्षी पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेससह इतर पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. इतर पक्षांतील उमेदवारांना गळाला लावण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. मागील पाच वर्षांत काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले काही नेते घरवापसीसाठी इच्छूक आहेत. पण त्यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय पक्षात घेणार नाही, असा पवित्रा माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

उत्तराखंड राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. भाजप सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री त्यांच्या आमदार मुलासह नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तसेच अजूनही काही नेते घरवापसी करण्यासाठी तयार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. पण यावरून माजी मुख्यमंत्री हरीश रावत नाराज आहेत. रावत यांनी या नेत्यांना महापापी म्हटलं आहे.

BJP, Congress
मोदी-शहांचं पोस्टर लावूनही भाजप उमेदवाराला मिळालं फक्त एक मत...

रावत म्हणाले, या महापापी लोकांनी 2016 मध्ये काँग्रेस सरकार पाडण्याचे महापाप केलं आहे. ते जोपर्यंत आपली चूक मान्य करून जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. या महापापामुळे उत्तराखंडला कलंक लागला आहे. त्यामुळे जोपर्यंत ते चूक मान्य करत नाहीत आणि काँग्रेससोबत निष्ठेने उभे राहण्याचे मान्य करत नाहीत, तोपर्यंत त्यांना पक्षात घेता कामा नये, असं रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य व त्यांच्या आमदार पुत्राने नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच इतर काही नेत्यांना पक्षात पुन्हा घेण्यासाठीही रावत यांची सहमती आहे. पण त्यांच्या बोलण्याचा रोख हरक सिंह रावत, सुबोध उनियाल, विजय बहुगुणा यांसह अन्य काही नेत्यांकडे असल्याची चर्चा आहे. तसेच आर्य यांच्या काँग्रेसमध्ये येण्यामुळेही रावत यांना आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे.

BJP, Congress
भाजपनं डच्चू दिलेल्या मनेका गांधी अखेर बोलल्या...

2016 मध्ये अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडल्याने रावत हे पक्षाला आधार राहिलेले एकमेव नेते ठरले होते. 2017 मध्ये पक्षात निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रावत यांच्या मनात पक्ष सोडलेल्या नेत्यांविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. ही नाराजी आजही कायम असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत खुद्द रावत यांचा दोन मतदारसंघात पराभव झाला होता.

Related Stories

No stories found.