अरे बुढिया, तुझसे कौन संपर्क करेगा; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली

विरोधी पक्षनेत्यांबद्दल बोलताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे.
uttarakhand bjp chief bansidhar bhagat remark creates controversy
uttarakhand bjp chief bansidhar bhagat remark creates controversy

डेहराडून : काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या डॉ. इंदिरा हृदयेश यांच्याबद्दल बोलताना उत्तराखंडचे भाजप प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची जीभ घसरली. त्यांनी हृदयेश यांच्याबद्दल अवमानकारक व अश्लील टिप्पणी केली असून, यावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. भगत यांनी माफी मागावी, अशी मागणही काँग्रेसने केली आहे. 

भाजपमधील काही नाराज आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा 79 वर्षांच्या काँग्रेस नेत्या हृदयेश यांनी नुकताच केला होता. यावर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना  प्रदेशाध्यक्ष भगत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'अरे बुढिया..तुझसे कौन संपर्क करेगा,' असे भगत म्हणाले आहेत. बुडत्या जहाजात बसण्यास कोण कशाला जाईल, असा सवालही त्यांनी केला आहे. 

यावरुन भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाची दखल घेऊन भगत यांना माफी मागण्यास सांगावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. 

यावर बोलताना इंदिरा हृदयेश म्हणाल्या की, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा त्या पक्षाचे प्रतिक असतो आणि त्या राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतो. माझ्याबद्दल भगत यांनी अवमानकारक वक्तव्य केले असून, यामुळे मी अतिशय दु:खी आहे. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याची दखल घेऊन भगत यांना माफी मागण्यास सांगावे. 

सरकारला धारेवर धरण्यात इंदिरा हृदयेश आघाडीवर आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यावर सरकारची कोंडी केली आहे. सरकारने लोकायुक्त नेमला नसून, यातून सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात किती गंभीर आहे हे दिसते, अशी टीकाही हृदयेश यांनी केली आहे.  

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे औद्योगिक सल्लागार के.एस.पनवार यांच्याशी निगडित कंपन्यांच्या करचुकवेगिरीचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. यावरुन काँग्रेस व भाजप आमनेसामने आले आहेत. मागील महिन्यात झालेल्या विधानसभा अधिवेशनातही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गदारोळ झाला होता. मुख्यमंत्र्यांची भ्रष्टाचार संपवल्याचा दावा ही केवळ घोषणा असल्याची टीका काँग्रेस करीत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com