मोठी बातमी : प्रियांका अन् राहुल गांधींसमोर भाजप सरकार झुकलं!

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते, या भीतीने सरकारने परवानगी नाकारली होती.
मोठी बातमी : प्रियांका अन् राहुल गांधींसमोर भाजप सरकार झुकलं!
Priyanka Gandhi and Rahul Gandhi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास विरोधी पक्षातील नेत्यांना मज्जाव करणारं उत्तर प्रदेश सरकार अखेर झुकलं आहे. सरकारच्या गृह विभागाने बुधवारी नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व राहुल गांधी यांच्यासह तीन जणांना लखीमपूर खीरी येथे जाण्यास परवानगी दिली आहे.

प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राहुल गांधी यांना सुरूवातीला सरकारने लखीमपूरला जाण्यास परवानगी नाकारली होती. पण त्यानंतरही त्यांनी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. लखनऊमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पण आपण दोन मुख्यमंत्र्यांसह तिथे जाणार असल्यानं कलम 144 चा प्रश्नच येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Priyanka Gandhi and Rahul Gandhi
आम्हाला मारा, गाडून टाका...आता भीती वाटत नाही!

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते, या भीतीने सरकारने परवानगी नाकारली होती. पण त्यानंतरही सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर आसुड ओढले अन् पंजाबचे व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसह विमानाने लखनऊकडे रवाना झाले. ते प्रवासात असतानाच उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यासह प्रियांका गांधी यांनाही लखीमपूरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

लखीमपूर खीरी येथील घटनेत वाहनांच्या ताफ्याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडले आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात चार नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झाली. सोमवारी पहाटे प्रियांका गांधी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लखीमपूरला निघालेल्या असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून त्या नजरकैदेत आहेत.

राहुल व प्रियांका गांधी हे छोराहा येथे जाण्याची शक्यता आहे. तिथे ते लवप्रित सिंग या 19 वर्षीय तरूणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर निधासन आणि नानपारा येथे जाऊन मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटतील. गांधींप्रमाणेच आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला परवानगी देण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.