अखेर ठरलं! अयोध्या अन् मथुरेकडे पाठ फिरवून योगी सुरक्षित मतदारसंघात!

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अयोध्या आणि मथुरा या दोन्ही मतदासंघाकडे पाठ फिरवली.
 Yogi Adityanath
Yogi Adityanathsarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्या आणि मथुरा या विधानसभा मतदारसंघांकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी सुरक्षित अशा गोरखपूरमधून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे योगींनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

भाजपने (BJP) आज उत्तर प्रदेशातील 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात योगी हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Yogi Adityanath
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीबाबत अजितदादांचं मोठं विधान

योगींनी आधी विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी, असा आग्रह होता. मात्र, योगींचा कल अयोध्येकडे होता. मात्र, राज्यातील पूर्व भागातील नेते भाजप सोडून जाण्याचे प्रमाण वाढल्याने नेतृत्वाने योगींनाच गोरखपूरमधून लढवण्याचा निर्णय घेतला. चालू आठवड्यात भाजपचे तीन मंत्र्यांसह 10 आमदार पक्ष सोडून बाहेर पडले आहेत. ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. राज्यातील बदलती राजकीय समीकरणे पाहता योगींनाच गोरखपूरमधून लढवून भाजप नेतृत्वाने सुरक्षित खेळी खेळल्याचे मानले जात आहे.

 Yogi Adityanath
काँग्रेसचा आमदार घसरला कंगनाच्या गालावर अन् व्हिडीओ झाला व्हायरल!

विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा लढविणारे योगी यांचीही इच्छा अयोध्येतून निवडणूक लढविण्याची असल्याचे सांगितले जात होते. अयोध्येतील हनुमान गढी व रामजन्मभूमी त्यांच्यासाठी बालपणापासून श्रद्धधेचे स्थान असल्याचे पक्षनेते सांगत होते. त्यामुळे योगी अयोध्याच निवडतील, असेही सांगितले जात होते. याचवेळी योगी यांनी मथुरेतून लढावे यासाठी राज्यसभा खासदार हरनाथ यादव यांनी भाजप नेतृत्वाला पत्र लिहिले होते. अखेर योगींनी या दोन्ही मतदारसंघाऐवजी गोरखपूरला पसंती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com