मुलगा नेपाळमध्ये पळाला? अखेर केंद्रीय मंत्र्यांनीच केला खुलासा

घटनेला पाच दिवस उलटूनही केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झालेली नाही. तो नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा सुरू आहे.
मुलगा नेपाळमध्ये पळाला? अखेर केंद्रीय मंत्र्यांनीच केला खुलासा
Ajay Mishra and Ashish MishraFile Photo

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला पाच दिवस उलटूनही केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक झालेली नाही. तो नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर अखेर मंत्र्यांनीच खुलासा केला आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने गदारोळ सुरू आहे. आशिष याला काल समन्स बजावूनही आज तो पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. यामुळे तो नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मंत्री अजय मिश्रा यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माझ्या मुलाला चौकशीसाठी बोलावले होते परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव आज तो जाऊ शकला नाही. आता तो उद्या चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होईल. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा मुलगा निष्पाप आहे.

Ajay Mishra and Ashish Mishra
सर्वोच्च न्यायालयानं सुनावल्यानंतरही उत्तर प्रदेश पोलिसांचे पहिले पाढे पंचावन्न

मंत्र्याच्या मुलाला अद्याप अटक न झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही आज तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुन्हा कालचाच पाढा गिरवला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या लखीमपूर खीरीतील घरावर पोलिसांनी आज नोटीस चिकटवली. त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने चौकशीसाठी हजर राहावे, अशी ही नोटीस आहे. दरम्यान, कालही सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारला झापले होते. त्यामुळे कालही पोलिसांनी मिश्रांच्या घरावर नोटीस चिकटवली होती.

Ajay Mishra and Ashish Mishra
केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक न झाल्याने सरन्यायाधीश संतापले अन् म्हणाले...

आता मिश्रांच्या घरावर दुसरी नोटीस चिकटवण्यात आली आहे. आधीच्या नोटिशीत त्याला आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. अटकेच्या भीतीने तो चौकशीला हजर राहिला नव्हता. आता दुसऱ्या नोटिशीनुसार त्याला उद्या (ता.9) सकाळी 9 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. उद्या त्याच्यावर पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी लव कुश आणि आशिष पांडे या दोघांनी अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.