केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला भीषण अपघात; पत्नी अन् सहकारी ठार

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला आज कर्नाटकातील अंकोला तालुक्यात अपघात झाला.
union minister of state sripad naik wife dies in accident in karnataka
union minister of state sripad naik wife dies in accident in karnataka

बंगळूर : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला आज कर्नाटकातील अंकोला येथे भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, नाईक यांच्या एका सहकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. नाईक यांना उपचारासाठी गोव्याला हलवण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. नाईक यांना गोव्यात योग्य उपचार मिळतील याची काळजी घेण्याची सूचना मोदींनी केली आहे. 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे मोटारीने यालपुराहून गोकर्णला जात असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करीत असलेल्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला. नाईक यांचा एक सहकारीही अपघातात ठार झाला आहे. अंकोला तालुक्यात हा अपघात घडला असून, हा तालुका हा उत्तर कर्नाटकात आहे. होसकांबी घाटात नाईक यांच्या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. 

नाईक यांच्यासोबत आणखी चार जण मोटारीतून प्रवास करीत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाईक हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार आहे. याचबरोबर ते संरक्षण राज्यमंत्रीही आहेत. नाईक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठे नेते आहेत. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निकटवर्तींयापैकी ते एक मानले जातात. गोव्यातील भाजपचे ज्येष्ठ आणि ताकदवान नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com