त्या दिवशी अचानक सगळं घडलं की मला काही समजू शकलंच नाही..!

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे भीषण अपघातात जखमी झाले होते. आता ते बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
union minister of state sripad naik discharged from goa hospital
union minister of state sripad naik discharged from goa hospital

पणजी : केंद्रीय राज्यमंत्री आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मागील महिन्यात झालेल्या गंभीर अपघातानंतर गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर नाईक यांनी पत्नीला गमावावे लागले त्या भीषण अपघाताचा अनुभव त्यांनी सांगितला.

श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला 11 जानेवाराली कर्नाटकातील अंकोला नजीक भीषण अपघात झाला होता. नाईक यांना उपचारासाठी गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे थेट गोव्याला गेले होते. 

उपघात घडल्यानंतर नाईक यांना 12 जानेवारीला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, त्यांना आता घरीही उपचार घेता येतील, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. 

रुग्णालयातून सोडल्यानंतर नाईक यांनी त्या भीषण अपघाताच्या आठवणी सांगितल्या. या अपघातात नाईक यांनी पत्नी आणि एका सहायकाला गमावावे लागले होते. त्या दिवशी अचानक सगळे घडले की मला काहीच समजू शकले नाही. सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला लवकर बरे होण्यास सांगितले असून, तोपर्यंत माझ्या मंत्रालयाचा तात्पुरता कार्यभार दुसऱ्या सहकाऱ्याकडे सोपवला आहे. डॉक्टरांनी मला परवानगी दिली तर मी 8 मार्चला संसदेत जाईन, असे नाईक यांनी म्हटले आहे. 

श्रीपाद नाईक हे मोटारीने यालपुराहून गोकर्णला जात असताना त्यांच्या मोटारीला 11 जानेवारीला अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करीत असलेल्या पत्नी विजया आणि नाईक यांचा स्वीय सहायकही अपघातात ठार झाला आहे. अंकोला तालुक्यात हा अपघात घडला होता. हा तालुका हा उत्तर कन्नड जिल्ह्यात आहे. होसकांबी घाटात नाईक यांच्या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. 

या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. नाईक यांना गोव्यात योग्य उपचार मिळतील याची काळजी घेण्याची सूचना मोदींनी केली होती. नाईक हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार आहे. याचबरोबर ते संरक्षण राज्यमंत्रीही आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com