राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी कुणामुळे? खुद्द त्यांनीच केला उलगडा - union minister narayan rane thanks everyone for wishes | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी कुणामुळे? खुद्द त्यांनीच केला उलगडा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. यात नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार नुकताच झाला. या विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे (Narayan Rane) यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे. याबद्दल राणेंनी आभार मानणारे जाहीर पत्र लिहिले आहे. यात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी कुणामुळे याचा उलगडा केला आहे. 

राणे या पत्रात त्यांना मंत्रिपदाची संधी कुणामुळे मिळाली याबद्दल उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आभार, आभार, आभार. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेत, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाली. 

केंद्रीय मंत्री पदावर निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून सर्व पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच, भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी मला फोन करुन व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या. काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळे मी येथवर पोहोचू शकलो, असे मी मानतो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत राहो, ही नम्र अपेक्षा! आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे भारावून गेल्यामुळे एका वाक्य माझ्या तोंडी आले ते असे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय? असो, भविष्यात प्रत्यक्ष भेटू व बोलू, असे राणेंनी म्हटले आहे. 

हेही वाचा : माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी इंडिगोचे पायलट बनतात तेव्हा...

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुमारे डझनभर खासदार दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबद्दल मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अखेर नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख