मुख्तार अब्बास नक्वींचा पत्ता कट अन् केंद्रीय मंत्रिमंडळातूनही डच्चू?

राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून बड्या नेत्यांना डच्चू
Mukhtar Abbas Naqvi
Mukhtar Abbas Naqvi Sarkarnama

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपने (BJP) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांना पत्ता कापण्यात आला आहे. नक्वी हे झारखंडमधून मागील वेळी राज्यसभेवर (Rajya Sabha) गेले होते. आता त्यांना संधी देण्यात आलेली नाही. यामुळे नक्वी यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील यादीत नक्वी यांचे नाव असल्यास त्यांचे मंत्रिपद वाचू शकते. (Rajya Sabha Election News Updates)

नक्वी यांच्यासोबत महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर आणि विनय सहस्रबुद्धे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रातून उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनाही संधी देण्यात आली आहे. नक्वी यांच्याजागी झारखंडमधून भाजपचे सरचिटणीस आदित्य साहू यांना उमेदवारी मिळाली आहे. नक्वी यांना राज्यसभेवर संधी न मिळाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.

Mukhtar Abbas Naqvi
सिद्धू मूसेवालाची हत्या का झाली? अखेर कारण आलं समोर

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. 31) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 18 उमेदवारांची घोषणा केली. यात सर्वाधिक म्हणजे सहा उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भाजपने या राज्यातून माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासोबतच बिहार आणि कर्नाटकमधूनही प्रत्येकी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Mukhtar Abbas Naqvi
शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई! राज्यसभेला डावलताच नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

भाजपचे राज्यनिहाय उमेदवार ः मध्य प्रदेश – कविता पाटीदार, कर्नाटक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जग्गेश, महाराष्ट्र – वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राजस्थान – घनश्याम तिवारी, उत्तर प्रदेश – लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधामोहन अग्रवाल, सुरेंद्रसिंह नागर, बाबूराम निषाद, दर्शना सिंह, संगीता यादव, उत्तराखंड – डॉ. कल्पना सैनी, बिहार – सतीशचंद्र दुबे, शंभू शरण पटेल, हरियाना - कृष्ण लाल पवार, झारखंड - आदित्य साहू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com