शपथ घेतल्यानंतर जोतिरादित्य शिंदेंच्या फेसबुकवर काँग्रेसचे कौतुक अन् मोदींवर हल्ला! - union minister jyotirditya scindia facebook account hacked | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शपथ घेतल्यानंतर जोतिरादित्य शिंदेंच्या फेसबुकवर काँग्रेसचे कौतुक अन् मोदींवर हल्ला!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार झाला आहे. यात जोतिरादित्य शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या फेसबुक अकाउंटवर काँग्रेसचे कौतुक आणि मोदींवर टीका सुरू झाल्याने खळबळ उडाली. अखेर त्यांचे अकाउंट हॅक झाल्यामुळे हे घडल्याचे समोर आले. 

जोतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांनी त्यांच्या फेसबुक उकाउंटवर ते काँग्रेसचे कौतुक करीत असलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. याचबरोबर या व्हिडीओत ते मोदींवर टीका करीत असल्याचे दिसत होते. यावरुन मोठी खळबळ उडाली. अखेर शिंदे यांच्या आयटी टीमने याबाबत फेसबुककडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले.  

शिंदे यांचे अकाउंट कुणी हॅक केले याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी ग्वाल्हेर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. शिंदेंचे फेसबुक अकाउंट हॅक होण्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. परंतु, त्यांचे अकाउंट आता पूर्ववत करण्यात यश आले आहे. शिंदे यांच्या फेसबुक अकाउंटवरील व्हिडीओमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. 

हेही वाचा : 30 वर्षांनी घडला इतिहास...पित्याने सांभाळलेल्या मंत्रालयाची धुरा पुत्राकडे 

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. आता जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख